scorecardresearch

Premium

मोदी सरकार आता ‘या’ कंपनीचा हिस्सा विकणार; ३८ हजार कोटींचा निधी जमवणार

वेदांतला त्यांची जागतिक जास्त मालमत्ता हिंदुस्थान झिंकला विकायची होती, ज्याला अनेक विश्लेषकांनी पूर्वीच्या सरकारी कंपनीच्या मोठ्या रोख रकमेचा वापर करण्याचा प्रयत्न म्हणून बघितले होते.

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्र सरकारने हिंदुस्थान झिंकमधील २९.५४ टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी लगबग सुरू केली आहे. यासाठी सरकारने विद्यमान महिन्यात अमेरिकेसह परदेशात रोडशोच्या आयोजनाची योजना आखली आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी हिंदुस्थान झिंकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता मात्र अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांत लिमिटेडच्या प्रस्तावामुळे या योजनेला अडथळा निर्माण झाला होता.

वेदांतला त्यांची जागतिक जास्त मालमत्ता हिंदुस्थान झिंकला विकायची होती, ज्याला अनेक विश्लेषकांनी पूर्वीच्या सरकारी कंपनीच्या मोठ्या रोख रकमेचा वापर करण्याचा प्रयत्न म्हणून बघितले होते. मात्र सरकारने मूल्यांकनाबाबत चिंता व्यक्त करत त्या निर्णयाला विरोध केला. वेदांतने दिलेल्या प्रस्तावाची मुदत गेल्या महिन्यात संपली असल्याने सरकार आता स्वतःची हिस्सेदारी विकण्याची योजना पुढे नेण्याचा विचार करत आहे.

couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

वर्ष १९६६ मध्ये स्थापन झालेली मेटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सध्याची हिंदुस्थान झिंक लिमिटेड या कंपनीत वेदान्त समूहाची ६४.९२ टक्के हिस्सेदारी आहे. समभागाच्या सध्याच्या बाजारभावानुसार, सरकारला हा हिस्सा विकल्यानंतर सुमारे ३८,००० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजारात हिंदुस्थान झिंकचा समभाग ३०७ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 19:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×