Zepto to move Bengaluru: महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रकल्प इतर राज्यात जात असताना आता आणखी एक मोठी कंपनी मुंबईतून बंगळुरूमध्ये जात असल्याचे समोर आले आहे. काही काळापासून वित्तीय क्षेत्रात स्वतःचे नाव करणाऱ्या झेप्टोने आता मुंबईच्या पवईमधील कार्यालय बंद करून बंगळुरूत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूतील सरजापूर येथे एका मोठ्या जागेत झेप्टोच्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र आणले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी मनीकंट्रोल संकेतस्थळाला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झेप्टोचे बंगळुरू येथे आधीपासूनच कार्यालय आहे. आता सर्व कॉर्पोरेट कर्मचारी याच कार्यालयात स्थलांतर होणार आहेत. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या झेप्टोचा व्यवसाय मुंबईत पसरलेला आहे. आता त्यांची तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट टीम बंगळुरू येथून काम करणार असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७०० ते १८०० कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येणार आहेत. झेप्टोच्या एका कर्मचाऱ्याने मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले की, कंपनीने सध्यातरी लवचिक धोरण अवलंबले आहे. पण नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात आम्हाला बंगळुरूमध्ये रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचा >> Sensex Today: गुंतवणूकदारांना सेन्सेक्स ‘पावला’; सोमवारच्या धक्क्यानंतर दिला मदतीचा हात; मागोमाग निफ्टीचाही पुढाकार!

ज्या कर्मचाऱ्यांना बंगळुरूमध्ये रुजू व्हायचे आहे, त्यांच्या स्थलांतराचा खर्च कंपनी उचलणार आहे. यामुळे कंपनीला तीन ते चार कोटींचा खर्च करावा लागणार आहे, असेही या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. कंपनीचे मुख्यालय मुंबईहून बंगळुरूला हलविल्यानंतर झेप्टोला भाड्यापोटी द्यावे लागणारे प्रती महिना ४० ते ५० लाख रुपये वाचणार आहेत.

मोठी जागा, मोठं कार्यालय

झेप्टोचे भारतात दोन कार्यालय आहे. मुंबईमध्ये असलेल्या कार्यालयाचे क्षेत्रफळ ८० ते ९० हजार स्क्वेअर फूट असल्याचे सांगितले जाते. तर बंगळुरूमध्ये यापेक्षा लहान ३० ते ४० हजार स्क्वेअर फुटांचे कार्यालय आहे. आता बंगळुरूमध्येच दीड लाख स्क्वेअर फुटांचे नवे कार्यालय घेण्यात येणार आहे. झेप्टोच्या प्रवक्त्यांनी मनीकंट्रोलशी बोलताना ही माहिती अधिकृत असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा >> Gautam Adani Succession Plan: उद्योगविश्वातून मोठी अपडेट, गौतम अदाणींचं निवृत्तीबाबत महत्त्वपूर्ण विधान; वारसांकडे सूत्र सोपवण्याबद्दल म्हणाले…

बंगळुरूच्या सरजापूर येथे स्विगी, फ्लिपकार्ट या कंपन्यांचेही मुख्यालय आहे. बंगळुरूत जाऊन झेप्टोही या कंपन्यांच्या रांगेत सहभागी होत आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या किती?

झेप्टोच्या १७०० ते १८०० कर्मचाऱ्यांपैकी मुंबईत जवळपास १००० कर्मचारी काम करतात. तर ४०० कर्मचारी बंगळुरू येथे कार्यरत आहेत. ३०० कर्मचारी इतर विविध ठिकाणांहून काम करतात. “मुंबईतील १००० कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के कर्मचाऱ्यांनी बंगळुरूमध्ये स्थलांतरीत होण्यास होकार दिला आहे, इतर १० टक्के कर्मचाऱ्यांशी बोलणी सुरू आहे. त्यामुळे जवळपास ९० टक्क्यांहून अधिक कर्मचारी बंगळुरूमध्ये जाण्यास तयार होतील”, असे कंपनीला आता वाटत आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai loss zepto to move its headquarters to bengaluru kvg
Show comments