Summit Active Asset Allocator Long Short Fund : स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) क्षेत्रात अग्रेसर असलेल्या समिट एसआयएफने आज आपल्या नव्या ‘समिट अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅसेट अ‍ॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंड’ या नवीन फंड ऑफरची (NFO) घोषणा केली आहे. पारंपारिक आर्बिट्राज धोरणांच्या पलीकडे जाऊन विविध मालमत्ता वर्ग आणि आधुनिक आर्थिक साधनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा मिळवून देणे, हा या फंडाचा मुख्य उद्देश आहे.

काय आहे वैशिष्ट्य?

  • हा एक विशिष्ट अंतराने गुंतवणूक करण्याचा फंड असून, यामध्ये इक्विटी, डेट, इक्विटी व डेट डेरिव्हेटिव्ह्ज, इनव्हिट्स आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये डायनॅमिक (लवचिक) पद्धतीने गुंतवणूक केली जाईल. यात डेरिव्हेटिव्ह्च्या माध्यमातून परवानगी असलेल्या साधनांवर मर्यादित ‘शॉर्ट पोझिशन्स’ घेण्याचीही मुभा असेल.
  • पारंपारिकपणे आर्बिट्राज फंड प्रामुख्याने कॅश-फ्युचर्स स्प्रेड्सवर अवलंबून असतात. परंतु, हा फंड एकाच पोर्टफोलिओमध्ये कॅश-फ्युचर्स व्यतिरिक्त सिंथेटिक आर्बिट्राज, इंडेक्स आर्बिट्राज, कमोडिटी आर्बिट्राज आणि स्पेशल सिच्युएशन्समधील आर्बिट्राज संधी एकत्र आणणार आहे.
  • हे धोरण बाजाराच्या दिशात्मक अंदाजांवर अवलंबून न राहता केवळ विविध बाजारांमधील किमतींच्या तफावतीचा लाभ घेण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
  • या फंडाचे व्यवस्थापन दीपक गुप्ता करणार असून, फंडाचा बेंचमार्क ४० टक्के निफ्टी ५०० TRI + ४० टक्के क्रिसिल शॉर्ट टर्म बाँड फंड इंडेक्स + २० टक्के आयकॉमडेक्स कंपोझिट इंडेक्स असा असणार आहे.

“आर्बिट्राजकडे सहसा केवळ कॅश-फ्युचर्स स्प्रेड्सच्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहिले जाते. पण बदलत्या आर्थिक बाजारात वेगवेगळ्या साधनांमध्ये किमतीच्या तफावतीच्या अनेक संधी निर्माण होतात. SIF फ्रेमवर्क आम्हाला या संधी शोधण्यासाठी एक विस्तृत व्यासपीठ देते. कोअर आर्बिट्राज पोर्टफोलिओला स्थिरता देईल, तर पूरक धोरणांमुळे अतिरिक्त परतावा मिळवण्यास मदत होईल. कोणतीही प्रमाणाबाहेर जोखीम न पत्करता शिस्तबद्ध पद्धतीने परतावा मिळवणे हे आमचे ध्येय आहे,” असं फंड मॅनेजर दीपक गुप्ता यांनी सांगितले.

गुंतवणूक आणि एक्झिट लोडचा तपशील

हा नवीन फंड १२ ऑक्टोबर २०२६ ते २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला आहे. एनएफओदरम्यान किमान गुंतवणुकीची रक्कम १०,००,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे. मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांच्या बाबतीत, एनएफओदरम्यान किमान गुंतवणुकीची रक्कम १,००,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे. एसआयपी गुंतवणुकीसाठी समिट एसआयएफच्या सर्व गुंतवणूक धोरणांमध्ये मिळून १०,००,००० रुपयांची किमान मर्यादा राखण्याच्या अटीवर अर्जाची किमान रक्कम १,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे.

लागू एनएव्हीनुसार सबस्क्रिप्शन्स दररोज उपलब्ध असतील, तर रिडेम्पशन आठवड्यातून दोनदा सोमवारी आणि बुधवारी उपलब्ध असेल. सोमवार किंवा बुधवार हा सुट्टीचा दिवस (नॉन-बिझनेस डे) असेल, तर लगेच येणारा पुढील कामकाजाचा दिवस ग्राह्य धरला जाईल. युनिट्सचे रिडेम्पशन किंवा स्विच-आउट ३० दिवस किंवा त्यापूर्वी केले तर या गुंतवणूक धोरणावर ०.५० टक्के एक्झिट लोड आकारला जाईल आणि ३० दिवसांनंतर, पण ६० दिवस किंवा त्यापूर्वी रिडेम्पशन किंवा स्विच-आउट केल्यास ०.२५ टक्के एक्झिट लोड आकारला जाईल. ६० दिवसांनंतर युनिट्सचे रिडेम्पशन किंवा स्विच-आउट केल्यास कोणताही एक्झिट लोड आकारला जाणार नाही.