scorecardresearch

Navil Noronha : देशातील सर्वात श्रीमंत सीईओ नवील नोरोन्हा; मुंबईत ७० कोटींचे घर अन् पगार जाणून थक्क व्हाल

DMart चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड (Avenue Supermarts Ltd) चे मालक आणि अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी नोरोन्हा यांना कंपनीत CEO म्हणून जबाबदारी दिली आहे.

navin noroha
navin noroha

Navil Noronha Success Story: एक रिटेल स्टोअर चालवणारी कंपनी DMart चे मुख्य कार्यकारी अधिकारी इग्नाटियस नवील नोरोन्हा जगातील सर्वात जास्त पगार मिळवणाऱ्या सीईओंपैकी एक नसले तरी ते देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत. निश्चितच ते खूप श्रीमंत आहेत. त्यांची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

DMart चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड (Avenue Supermarts Ltd) चे मालक आणि अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी नोरोन्हा यांना कंपनीत CEO म्हणून जबाबदारी दिली आहे. नोरोन्हा हे सीईओपदी आल्यापासून एव्हेन्यू सुपरमार्ट्स मागील 5 वर्षांपासून फायद्यात असून, प्रतिस्पर्ध्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. सीईओ नवील नोरोन्हा खूप श्रीमंत असूनही ते लो-प्रोफाइल राहतात आणि उद्योगात एक नम्र सीईओ म्हणून ओळखले जातात. ऑक्टोबर २०२१ मध्ये नोरोन्हा अब्जाधीश सीईओंच्या क्लबमध्ये सामील झाले. नोरोन्हा यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार मिळवला

हिंदुस्थान युनिलिव्हरमध्येही काम केले

DMart मध्ये सामील होण्यापूर्वी नोरोन्हा हे हिंदुस्तान युनिलिव्हर येथे मार्केट रिसर्च आणि आधुनिक व्यापाराच्या क्षेत्रात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत होते. एव्हेन्यू सुपरमार्केटमध्ये नोरोन्हा यांची सुमारे २ टक्के भागीदारी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोरोन्हा यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार मिळवला. २००४ मध्ये त्यांनी DMart चे CEO म्हणून जबाबदारी स्वीकारली.

मुंबईत ७० कोटींना विकत घेतले घर

नोरोन्हा यांनी गेल्या वर्षी मुंबईत ७० कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. त्यांनी वांद्रे पूर्व येथे १० कारच्या पार्किंगसाठी दोन युनिट्स बुक केल्या होत्या. त्यांची ही मालमत्ता ९,५५२ चौरस फुटात आहे. अहवालानुसार, त्यांनी ६६ कोटी रुपये आणि त्यासाठी ३.३० कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. ही मालमत्ता नोरोन्हा आणि त्यांची पत्नी काजल नोरोन्हा यांनी संयुक्तपणे खरेदी केली होती.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 10:35 IST

संबंधित बातम्या