1 August 2026 Rule Changes impact on personal finance: जुलै महिना संपून ऑगस्ट महिना सुरू होण्यास आता केवळ काही दिवसच उरले आहेत. नवीन महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये रेल्वेचे तिकीट त्वरित बुक करण्याच्या नियमांपासून ते जीएसटी संबंधित निकषांमधील बदलांपर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. याचबरोबर ग्राहकांचे एलपीजी सिलिंडर आणि बँकिंग नियमांच्या बदलांवरही लक्ष ठेवून आहेत.

जीएसटी-संबंधित नियम

कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी ई-इनव्हॉइस आणि ई-वे बिल प्रणालींमध्ये सुधारणा केली जात आहे. या बदलांनुसार, ‘बिल-टू-शिप-टू’ व्यवहारांसाठी ‘शिप-टू’ जीएसटीआयएन (GSTIN) देणे अनिवार्य असेल. हा बदल १ ऑगस्टपासून लागू होण्याची शक्यता आहे.

एलपीजी सिलिंडर

ऑईल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे नवीन दर जाहीर करतात. १ जुलै रोजी या कंपन्यांनी एलपीजीच्या दरात कपात केली होती. विशेषतः १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष ऑगस्ट महिन्यातील एलपीजीच्या दरांकडे लागले आहे.

बँकेच्या नियमांमील बदल

पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून अनेक बँका त्यांच्या सेवा शुल्कात बदल करणार आहेत. यामध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचाही समावेश आहे. ही बँक १ तारखेपासून ग्राहकांसाठीच्या ‘एसएमएस अलर्ट’ शुल्कात बदल लागू करणार आहे.

आयटीआर

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आयटीआर-१ आणि आयटीआर-२ फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली होती. ज्या व्यक्तींनी या मुदतीपर्यंत आपला आयटीआर भरला नाही, त्यांना आता दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त, रिटर्न भरण्यास उशीर झाल्यामुळे विशिष्ट कर प्रणाली निवडण्याचा पर्याय मर्यादित होऊ शकतो. पण, आयटीआर-३ आणि आयटीआर-४ साठी अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे. उशिरा भरल्या जाणाऱ्या रिटर्नसाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे आणि सुधारित रिटर्नसाठी ती ३१ मार्च २०२७ आहे.

तत्काळ रेल्वे तिकीट नियमांमध्ये बदल

भारतीय रेल्वे १ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल करण्याची शक्यता आहे. या नवीन व्यवस्थेअंतर्गत, टोकन देण्याची प्रक्रिया तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होण्याच्या वेळेलाच केली जाईल, ज्यामुळे आरक्षण खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यापूर्वी, लोकांना वेगवेगळ्या वेळी खिडकीवर जावे लागत असे, प्रथम टोकन घेण्यासाठी आणि त्यानंतर तिकीट बुक करण्यासाठी.