Amul Ghee Butter Price Hike Diwali : दिवाळीच्या तोंडावर फराळाची तयारी करणाऱ्या सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. देशातील आघाडीची डेअरी कंपनी ‘अमूल’ने आपल्या तूप आणि लोण्याच्या किमतीत दरवाढ केली आहे. १ किलो तुपामागे आता तुम्हाला ५० रुपये अधिक मोजावे लागाणार असून, ५०० ग्रॅमच्या लोण्याच्या पॅकेटमागे १५ रुपयांची दरवाढ झाली आहे. एकीकडे दरवाढ आणि दुसरीकडे बाजारात ‘अमूल काऊ तूप’चा तुटवडा यामुळे गृहिणींचे गणित कोलमडले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

सुधारित दरांचा तक्ता

अमूल उत्पादनजुनी किंमत (रुपये)नवीन किंमत (रुपये)एकूण वाढ (रुपये)
तूप (१ किलो कार्टन)६३०६८०५०
प्युअर तूप (५०० ग्रॅम पाऊच)३२५३४५२०
बटर (१०० ग्रॅम पॅक)६३६६३
बटर (५०० ग्रॅम पॅक)३१०३२५१५


अमूलच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गायीच्या तुपाचा दर प्रति लिटर ७४० रुपये, सागर तूप ७१० रुपये आणि म्हशीचे तूप ७२० रुपये आहे. मात्र, ऑनलाइन पोर्टलवर प्युअर तूप, म्हशीचे तूप आणि कॉम्बो पॅक्सचा साठा ‘सोल्ड आऊट’ दिसत आहे.

जीएसटी कपातीचा दिलासा दरवाढीमुळे गेला

सप्टेंबर २०२५ मध्ये केंद्र सरकारने डेअरी उत्पादनावरील जीएसटी १२ टक्केवरून ५ टक्क्यांवर आणला होता. त्या वेळी अमूलने ७०० हून अधिक उत्पादनांचे दर कमी केले होते. मात्र, आता झालेल्या ताज्या दरवाढीमुळे ग्राहकांना जीएसटी कपातीतून मिळालेला दिलासा आता मिळणार नाही.

उत्पादनजीएसटी कपातीपूर्वी (रुपये)जीएसटी कपातीनंतर (रुपये)तत्कालीन सूट (रुपये)
तूप (१ लिटर कार्टन)६५०६१०४०
तूप (५ लिटर डबा)३,२७५३,०७५२००
बटर (१०० ग्रॅम पॅक)६२५८४
बटर (५०० ग्रॅम पॅक)३०५२८५२०

बनावट तुपावरील कारवाईमुळे मागणीत प्रचंड वाढ

गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या सहा महिन्यांत अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई करत सुमारे २ लाख किलो बनावट तूप जप्त केले आहे. या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये बनावट तुपाबाबत भीती निर्माण झाली आहे. परिणामी अमूलसारख्या विश्वासार्ह ब्रँडेड उत्पादनांकडे ग्राहकांचा कल अचानक वाढला आहे.

अमूलशी संबंधित सहकारी क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षातील एकूण तूप खपापैकी ४५ टक्यांपेक्षा जास्त वापर हा एकट्या सणासुदीच्या काळात होतो. त्यामुळे एकाच वेळी मागणीत झालेली प्रचंड वाढ आणि पुरवठा साखळीवरील ताणामुळे किमती वाढल्या आहेत.

पुणे, कोलकातासह प्रमुख शहरांत तुपाचा तुटवडा

केवळ दरवाढच नाही, तर बाजारात अमूल तुपाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. गणेशोत्सवापासूनच गुजरात मधील अहमदाबाद, वडोदरा शहरांत साठ्याची टंचाई आहे. अहमदाबादमधील सॅटेलाइट भागातील ‘डी-मार्ट’मध्ये अमूल तूप आणि बटर उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.

याशिवाय, जुलै आणि सप्टेंबर महिन्यांत पुणे, कोलकाता आणि जम्मू-काश्मीर यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्येही अमूलच्या पुरवठ्यात अडथळे आले होते. वाढत्या मागणीच्या तुलनेत वितरकांना पुरेसा साठा मिळत नसल्याची तक्रार विक्रेते करत आहेत. दरम्यान, या तुटवडा आणि दरवाढीबाबत अमूलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.