मुंबई: देशातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ‘ॲक्सिसम्युच्युअलफंडा’ने नवीन ‘ॲक्सिस निफ्टी ५०इक्वलवेट्स इंडेक्स फंड’ ही निर्देशांकाधारित योजना बाजारातआणलीआहे. या योजनेतगुंतवणूकदारांसाठी ३ जुलै२०२६ ते १७जुलै२०२६ या कालावधीत गुंतवणूक करता येईल. या नवीन फंड प्रस्तुती अर्थात एनएफ ओकालावधीत आणि त्यानंतरही किमान१०० रुपये आणित्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल.
ही योजना निफ्टी ५०इक्वल वेट इंडेक्स या निर्देशांकाच्या कामगिरीचा मागोवा घेईल. या योजनेत निफ्टी निर्देशांकातील सर्व ५०आघाडीच्या ब्लू-चिप कंपन्यांमध्ये समान प्रमाणातनिधीवाटप केला जाईल.यामुळेकाहीमोजक्याकंपन्यांवरीलअवलंबित्व कमी होऊनगुंतवणूकदारांना संतुलित पोर्टफोलिओचा लाभ मिळेल.नंदिक मलिक आणि रोहित गौतम या योजनेचेनिधी व्यवस्थापन पाहतील.
पूर्व-निर्धारित नियमांच्याआधारे दर तिमाहीला या पोर्टफोलिओचेपुनर्संतुलन केले जाईल, ज्यामुळे वैयक्तिक पूर्वग्रहांना वाव राहणारनाही. २०१९-२० मध्ये या प्रकारच्यापॅसिव्हयोजनांचीव्यवस्थापनाखालीलमालमत्ता(एयूएम)सुमारे१०० कोटी रुपये होती, जी २०२५-२६ मध्येजवळपास १०,००० कोटी रुपयांवरपोहोचलीआहे.
गुंतवणूकदार आता त्यांच्या मुख्य पोर्टफोलिओलाकार्यक्षमआणि वैविध्यपूर्ण पॅसिव्ह गुंतवणूक पर्यायांची जोडदेण्यास प्राधान्य देत आहेत. अशा प्रकारच्या गुंतवणूक धोरणांमुळे दीर्घकालीन कालावधीत स्थिर परतावामिळण्यासमदत होईल, असेॲक्सिसएएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. गोपकुमार या योजनेसंबंधानेम्हणाले.पॅसिव्हगुंतवणुकीच्या गरजा पूर्ण करू शकतील, अशाअष्टपैलूआणि मजबूत योजनांचीनिर्मितीकरण्यावरपुढेही भर राहिल, असेत्यांनी स्पष्ट केले.
‘ॲक्सिसम्युच्यु अलफंडा’च्या या योजनेत दर तिमाहीला पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन केले जाते. याचा फायदा असा की, ज्या कंपन्यांचे शेअर्स खूप वाढले आहेत, त्याविकून नफा वसूल केला जातो. मात्र ज्या कंपन्यांचेशेअर्सस्वस्तझाले आहेत, त्यामध्ये अधिक खरेदी केली जाते. ही प्रक्रिया आपो आपआणि नियमांनुसार होत असल्याने गुंतवणूक दाराला बाजाराच्या चढ-उताराचा चांगला फायदा मिळतो. त्यामुळे समान जोखीम असूनही ‘निफ्टी५०इक्वल वेट इंडेक्स’ने वेगवेगळ्या कालावधीत नियमित ‘निफ्टी ५० इंडेक्स’पेक्षा अधिक आणि सरस परतावा दिला आहे आणि हे गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येते.
