Bhuvneshwar Kumar Net Worth and Business journey: सचिन तेंडुलकर या दिग्गजाला रणजी चषकाच्या सामन्यात शून्यावर बाद केल्यानंतर भुवनेश्वर कुमार पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भुवीच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय संघात जागा मिळवण्यासाठी झगडत असलेला भुवनेश्वर आयपीएलमध्ये मात्र सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. यापूर्वी दोन वेळा ‘पर्पल कॅप’ मिळवणारा भुवनेश्वर यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून दमदार कामगिरी करत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो २२ विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे.

भुवनेश्वर कुमारची व्यावसायिक खेळी

जगभरातील क्रिकेट मैदाने गाजवत असताना, भुवी पडद्यामागे एक वेगळे साम्राज्य उभारत होता. शिवालिक असोसिएट्सच्या माध्यमातून त्याने व्यवसायात क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. यात त्याच्या यशाचा पाया असलेल्या कुटुंबाचा पत्नी नुपूर आणि आई इंद्रेश देवी यांचा मोठा वाटा आहे.

शिवालिक असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड ही मेरठमधील एक खाद्य आणि पेय कंपनी आहे. या कंपनीत तो २०१८ मध्ये संचालक म्हणून सहभागी झाला. त्याची पत्नी नुपूर नागर आणि त्याची आई इंद्रेश देवीदेखील या कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत.

बीके क्रिकेट अकादमी

याचबरोबर भुवनेश्वरने मेरठच्या प्रतापपूरमध्ये २०२४ साली बीके क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. ही एक नोंदणीकृत एक एलएलपी आहे. जिथे आज जिथे मेरठमधील शेकडो मुले क्रिकेटचे धडे घेत आहे. इथे केवळ फलंदाजी, गोलंदाजीच नव्हे तर संयम, शिस्त आणि दूरदृष्टीचे धडेही गिरवत आहेत.

पिकल प्रोजचा सह-संस्थापक

भुवनेश्वर कुमार हा पिकल प्रोज (Pickle Pros) या कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी एक आहे. देशभरात पिकलबॉल खेळाचा प्रसार आणि विकास करण्याच्या उद्देशाने, जुलै २०२५ मध्ये या कंपनीची सुरुवात करण्यात आली होती. सहकारी क्रिकेटपटू इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यासह भुवनेश्वरने या खेळासाठी अधिक अद्ययावत पायाभूत सुविधा उभारण्याच्या उद्देशाने ‘LegaXy’ आणि ‘M3M Foundation’ यांच्याशी भागीदारी केली आहे.

शहरे, लहान गावे आणि अगदी तळागाळातील भागांमध्ये मिळून ५० आधुनिक पिकलबॉल कोर्ट्स उभारणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून हा खेळ सर्वांसाठी अधिक सहज उपलब्ध होईल.

भुवनेश्वरची एकूण संपत्ती किती?

स्विंग किंग म्हणून ओळखला जाणारा भुवनेश्वर कुमार ॲसिक्स, प्लेयरझपॉट, न्यूट्रामंत्रा यांसारख्या ब्रँड्सची जाहिरात करतो. हे असे ब्रँड्स आहेत ज्यांचा विश्वासार्हतेवर जास्त ग्लॅमरवर कमी विश्वास आहे.

भुवनेश्वरची एकूण संपत्ती ७०-७५ कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक बीएमडब्ल्यू, ऑडी क्यू३ आणि मर्सिडीज सी-क्लास या अलिशान कार आहेत. याचबरोबर एक भुवनेश्वरने एक सुंचर बंगलाही बांधला आहे.

भुवनेश्वर जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेईल तेव्हा तो समालोचनाच्या संधी शोधणारा एखादा माजी क्रिकेटपटू नसेल, तर तो एक व्यावसायिक असेल. एक संचालक असेल. असा एक माणूस, ज्याने इतर सर्वजण त्याला गोलंदाजी करताना पाहत असतानाच, स्वतः काहीतरी उभारून ठेवले आहे.