DA Hike 3 Percent Salary Calculation: केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. या वाढीमुळे मूळ वेतन आणि पेन्शनवरील महागाई भत्त्याचा दर ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर पोहोचणार आहे, ज्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात भर पडणार आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे ४८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.

पगारात किती वाढ?

महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमधील प्रत्यक्ष वाढ ही कर्मचाऱ्याचा मूळ पगार आणि वेतन स्तर यावर अवलंबून असेल. महागाई भत्ता हा मूळ पगाराच्या टक्केवारीनुसार मोजला जात असल्याने, ज्यांचा मूळ पगार जास्त आहे त्यांना दरमहा मिळणारी वाढही अधिक असेल.

बँकबाझारनुसार स्तर १ वर १८००० रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा ५४० रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळेल, ज्यामुळे १२ महिन्यांत एकूण ६४८० रुपयांची वाढ होईल. स्तर २ वर दरमहा ५९७ रुपयांची वाढ होईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची वार्षिक वाढ ७१६४ रुपयांपर्यंत पोहोचेल.

स्तर ३ वरील कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणारी अतिरिक्त ६५१ रुपयांची मासिक रक्कम वार्षिक ७८१२ रुपयांच्या बरोबरीची असेल. स्तर ४ वरील कर्मचारी ज्यांचा मूळ पगार २५५०० रुपये आहे त्यांना दरमहा ७६५ रुपयांची वाढ मिळेल, म्हणजेच त्यांना वार्षिक ९१८० रुपयांचा लाभ होईल.

स्तर ६ वर महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा लाभ दरमहा १००० रुपयांच्या वर जातो. या स्तरावर ३५४०० रुपये मूळ पगार असलेले कर्मचारी दरमहा १०६२ रुपये अतिरिक्त मिळवतील, ज्याची वार्षिक बेरीज १२७४४ रुपये इतकी होते.

स्तर ७ वर अतिरिक्त रक्कम दरमहा १३४७ रुपये किंवा वार्षिक १६१६४ रुपये असेल. हा मासिक लाभ स्तर ८ वर १४२८ रुपये, स्तर ९ वर १५९३ रुपये आणि स्तर १० वर १६८३ रुपयांपर्यंत वाढेल. स्तर १० वरील कर्मचाऱ्यांना यामुळे १२ महिन्यांत एकूण २०१९६ रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळेल.