Chandukaka Saraf Diwali Gold Offers : दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी सराफा दुकानदारांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. २०० वर्षांची विश्वासाची परंपरा असलेला महाराष्ट्रातील अग्रगण्य ब्रँड ‘चंदुकाका सराफ’ यंदा ग्राहकांसाठी बंपर ऑफर्स घेऊन आले आहेत. आकर्षक दागिन्यांचे संग्रह, विशेष सवलत आणि टाटा टियागो कार, बुलेट, स्कूटर्ससह तब्बल २०० बक्षिसं जिंकण्याची ग्राहकांनी संधी असणार आहे.

‘चंदुकाका सराफ’कडून सवलत अन् बक्षिसांची खैरात

दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी पारंपरिक सोन्याचे, हिऱ्यांचे, ब्रायडल तसेच हलक्या वजनाचे आणि आधुनिक डिझाइन्सचे दागिने उपलब्ध आहेत. यासोबतच सोन्याच्या दागिन्यांवर फक्त ६.९९% घडणावळ आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर ०% घडणावळ अशा आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यंदाच्या विशेष उपक्रमांतर्गत ग्राहकांना टाटा टियागो कार, ज्युपिटर स्कूटर, बुलेट मोटारसायकल, मोबाईल फोन, गिफ्ट व्हाउचर्ससह एकूण २०० बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

याबाबत बोलताना चंदुकाका सराफचे व्यवस्थापकीय संचालक सम्यक किशोरकुमार शाह म्हणाले, “बारामतीतून सुरू झालेला आमचा प्रवास आज दोनशे वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रवासात ग्राहकांनी दिलेला विश्वास आणि पिढ्यान्‌पिढ्यांनी जपलेले नाते हीच आमची खरी संपत्ती आहे. बदलत्या काळानुसार पारंपरिक दागिन्यांसोबतच तरुण पिढीच्या आवडीनुसार आधुनिक आणि हलक्या वजनाचे दागिने उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. यंदाच्या दिवाळीत २०० बक्षिसांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आनंदात सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न आहे.” ग्राहकांनी दिवाळीच्या खास ऑफर्स आणि आकर्षक दागिन्यांच्या संग्रहाचा लाभ घेण्यासाठी चंदुकाका सराफच्या पनवेल येथील नील हार्मिटेज, वासुदेव बळवंत फडके रोड येथे असलेल्या दालनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.