PM Modi Gold Purchase Appeal highlights the connection between gold imports, crude oil prices and Rupee: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना लग्नसमारंभांसाठी सोन्याची खरेदी करणे एका वर्षासाठी टाळण्याचे केलेले आवाहन सुरुवातीला कदाचित अनेकांना काहीसे विचित्र वाटले असेल. परंतु पंतप्रधानांच्या या विधानामागे जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात भारताच्या परकीय चलन साठ्यावर येणारा ताण आणि कमकुवत होत जाणारा रुपया ही व्यापक आर्थिक चिंता दडलेली आहे.

मध्य-पूर्वेतील संघर्ष आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) परिसरातील वाढता तणाव, यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असतानाच, पंतप्रधानांनी हे भाष्य केले आहे.

गेल्या काही आठवड्यांत जागतिक कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल सुमारे ७० डॉलरवरून वाढून जवळपास १२६ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत, यामुळे भारताचे आयात बिल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंधनाच्या दरात त्वरित वाढ करण्याची कोणतीही घोषणा न करताच, मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याची, तसेच परकीय चलनाची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे वारंवार अधोरेखित केले.

“जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे. पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठी खर्च होणारे परकीय चलन, पेट्रोल-डिझेलची बचत करून वाचवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

मात्र, त्यांनी केलेल्या आणखी एका आवाहनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे, “मी लोकांना असे आवाहन करेन की, त्यांनी पुढील एक वर्षासाठी लग्नसमारंभांकरिता सोन्याची खरेदी करू नये”, असे ते म्हणाले.

तेलाच्या संकटाच्या काळात सोने समस्या का बनते?

आर्थिक दृष्ट्या पाहता, भारत सोने व कच्च्ये तेल मोठ्या प्रमाणावर आयात करतो आणि त्यांचे मूल्य अमेरिकन डॉलर्समध्ये चुकते केले जाते. भारताच्या कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी सुमारे ८५% तेल आयात केले जाते. तसेच, सोने आयात करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी भारत हा एक आहे.

याचा अर्थ असा की, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होते आणि सोन्याची आयातही मोठ्या प्रमाणावर सुरू राहते,
तेव्हा या आयातीचे मूल्य चुकते करण्यासाठी भारताला पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक डॉलर्सची आवश्यकता भासते. यामुळे चलन बाजारात डॉलर्सची मागणी वाढते आणि भारतीय रुपयावर दबाव निर्माण होतो.

सोने खरेदीचा रुपयावर कसा परिणाम होऊ शकतो

जेव्हा जागतिक संकटाच्या काळात कुटुंबे मोठ्या प्रमाणात आयात केलेले सोने खरेदी करतात, तेव्हा देशातून अधिक डॉलर बाहेर जातात. यामुळे भारताची चालू खात्यातील तूट वाढू शकते, जी आयात आणि निर्यातीमधील तफावत मोजते. वाढत्या तुटीमुळे अनेकदा रुपया कमकुवत होतो, कारण देश कमावण्यापेक्षा जास्त परकीय चलन खर्च करत असतो.

तेलाच्या वाढलेल्या किमती, भू-राजकीय तणाव किंवा रुपया कमजोर होतो तेव्हाही सरकार सोन्याच्या आयातीबाबत सावध होते.

सर्वसामान्यांनी सोने खरेदीने खरोखरच काही फरक पडतो का?

एखाद्या एका कुटुंबाने दागिन्यांची खरेदी पुढे ढकलल्याने रुपयाच्या मूल्यात कोणताही बदल घडणार नाही. परंतु, अर्थतज्ज्ञ मात्र लक्षावधी कुटुंबांकडून होणाऱ्या एकूण मागणीचा विचार करतात. भारत दरवर्षी शेकडो टन सोन्याची आयात करतो. लग्नसराईच्या काळात आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, सोन्याकडे एक ‘सुरक्षित मालमत्ता’ म्हणून पाहिले जात असल्याने, सोन्याची मागणी अनेकदा आणखी वाढते.

ज्या वेळी तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारताचे आयातीचे बिल आधीच प्रचंड फुगत आहे, अशा वेळी सोन्याच्या आयातीमुळे होणारा डॉलरचा अतिरिक्त बहिर्प्रवाह टाळण्यास धोरणकर्ते विशेष उत्सुक असल्याचे दिसून येते.