Donald Trump claims blocking the Strait of Hormuz would cost Iran 500 million dollars in daily oil revenue: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे की, इराणला ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ बंद राहावी असे वाटत नाही. कारण ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ राहिल्यास इराणला महसुलाच्या स्वरूपात दररोज सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सचे (जवळपास ४,१५० कोटी रुपये) नुकसान सोसावे लागेल.
‘Truth Social’ वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प (Donald Trump) यांनी असा दावा केला की, इराण तेलाच्या वाहतुकीचा हा महत्त्वाचा मार्ग खुला राहावा यासाठी आग्रही आहे, जेणेकरून त्यांना त्यातून मिळणारी कमाई सुरू ठेवता येईल. तसेच, ही सामुद्रधुनी बंद करण्याची कोणतीही धमकी म्हणजे इराणने आपली “आब्रू वाचवण्याचा” केलेला एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी सुचवले.
“इराणला ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद व्हावी असे वाटत नाही. उलट, ती खुली राहावी अशीच त्यांची इच्छा आहे, जेणेकरून त्यांना दररोज ५०० दशलक्ष डॉलर्सची (जवळपास ४,१५० कोटी रुपये) कमाई करता येईल. जर ही सामुद्रधुनी बंद झाली, तर त्यांना तेवढे नुकसान सोसावे लागेल”, असे ट्रम्प (Donald Trump) यांनी लिहिले.
त्यांनी पुढे असा दावा केला की, अमेरिकेने ही सामुद्रधुनी प्रत्यक्षात ‘रोखली’ (Blocked) झाली आहे. तसेच, ती पुन्हा खुली करण्याच्या मागणीसह इराणी अधिकाऱ्यांनी अलीकडेच आपल्याशी संपर्क साधला होता, असेही त्यांनी नमूद केले.
“पण जर ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ खुली केली तर इराणसोबत कोणताही करार होणे कधीच शक्य होणार नाही. अर्थात, जोपर्यंत आपण त्यांच्या उर्वरित देशाचा, त्यांच्या नेत्यांसह, स्फोट घडवून उध्वस्त करत नाही तोपर्यंत!”, असे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुढे नमूद केले.
इराणचा समावेश असलेल्या युद्धविराम कराराचा कालावधी वाढवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि दोन्ही बाजूंकडून सुरू असलेली लष्करी हालचाल (शक्तीप्रदर्शन) यामुळे तणाव वढलेला असतानाच, ट्रम्प (Donald Trump) यांची ही विधाने समोर आली आहेत.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर तेलाच्या किमती घसरल्या
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबरोबरचा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवल्यानंतर, बुधवारी आशियाई बाजारात तेलाच्या किमती घसरल्या. पण, भविष्यातील शांतता चर्चेबद्दलची अनिश्चितता आणि पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे बाजारात तणाव निर्माण झाला आहे.
पुरवठ्यातील व्यत्ययांबद्दलची चिंता कायम राहिल्याने, विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने, तेलाच्या किमतीतील घसरण मर्यादित राहिली. इराणविरुद्ध अमेरिकेची नौदल नाकेबंदीही मोठ्या प्रमाणात कायम होती, ज्यामुळे होर्मुझमधून जहाजांची वाहतूक अत्यंत कमी झाली होती.
ब्रेंट तेलाचे वायदे (फ्युचर्स) ०.४% घसरून प्रति बॅरल ९८.१३ डॉलरवर आले, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाचे वायदे ०१:०३ GMT पर्यंत ०.४% घसरून प्रति बॅरल ८५.५९ डॉलरवर आले. सत्राच्या सुरुवातीला दोन्ही करारांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक पातळीवर चढ-उतार होत होते.
