EPFO WhatsApp Services : कोट्यवधी नोकरपेशा मंडळींना आता त्यांच्या पीएफशी संबंधित काम करणे आता आधीपेक्षा सोपे होणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO)आपल्या कोट्यवधी सदस्यांना दिलासा देण्यासाठी दोन खास पावले सुरु करण्याच्या तयारीत आहे. पहिले पाऊल म्हणजे आता लोकांना व्हॉट्सअपद्वारे पीएफशी संबंधित सर्व सेवा मिळणार आहे. दुसरे पाऊल म्हणजे त्यांची जुनी बरीच वर्षे बंद पडलेली खाती ज्यात एक हजार रुपयांपर्यंतचे बॅलन्स आहे त्यांचे ऑटोमेटिक सेटलमेंट केले जाणार आहे. यातली What’s App ची सेवा सुरू करण्यात आली आहे. EPFO ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
What’s App सेवा कशी वापरायची?
१) EPFO ची What’s App सेवा वापरण्यासाठी EPFO ने एक क्यूआर कोड दिला आहे तो स्कॅन करून तुम्ही चॅटबोटला संलग्न होऊ शकता.
२) त्याचप्रमाणे +918796441800 हा क्रमांकही दिला आहे. कोड स्कॅन करायचा नसेल तर हा क्रमांक व्हॉट्स अॅप सेवेचा क्रमांक म्हणून तुमच्या फोनमध्ये सेव्ह करू शकता.
३) What’s App सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय येतो. त्यानंतर चार पर्याय समोर येतात.
४) चेक बॅलन्स, शेवटचे ५ व्यवहार, पासबुक डाऊनलोड, भाषा बदल निवडीचा पर्याय. यापैकी जी सेवा तुम्हाला हवी आहे त्यावर क्लिक केलं की तपशील मिळतात.
व्हॉट्सअपद्वारे सोपा होणार पीएफचा मार्ग
डिजिटल काळात आपल्या सदस्यासोबत संपर्क बनवण्यासाठी संघटना आता व्हॉट्सअपची मदत घेणार आहे. ही सुविधा सुरु झाल्यानंतर पीएफ खातेधारकांना आपल्या सुविधांपर्यंत पोहचण्यासाठी एक नवीन आणि सोपे माध्यम मिळणार आहे. यामुळे ईपीएफओची सेवा आधीच्या तुलनेत खूपच सुविधाजनक होणार आहेत. पीएफशी संबंधित माहिती घेण्यासाठी सदस्यांच्या जवळ व्हॉट्सअपच्या रुपात एक थेट पर्याय उपलब्ध असणार आहे.
