मुंबई : गुंतवणूकदारांना केले मालामाल! फेसबुकच्या ऐतिहासिक आयपीओला १४ वर्षे पूर्णफेसबुकच्या अमेरिकेतील शेअर बाजारातील पदार्पणाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स ही असून ऑक्टोबर २०२१ मध्ये फेसबुकचे नाव बदलून ‘मेटा’ करण्यात आले.

१८ मे २०१२ रोजी सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेसबुकची (आताची मेटा) प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) झाली होती. या आयपीओद्वारे कंपनीने तब्बल १६ अब्ज डॉलरची (१६ बिलियन डॉलर) निधी उभारणी केली होती. त्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील (Tech Industry) हा आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरला होता, ज्याने वॉल स्ट्रीट आणि जागतिक शेअर बाजाराची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली.

फेसबुकचे १८ मे २०१२ रोजी झालेले आयपीओ लिस्टिंग ही जागतिक शेअर बाजाराच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना मानली जाते. त्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील हा आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरला होता. ही ऐतिहासिक सूचिबद्धता कशी झाली होती, ते जाणून घेऊया.

आयपीओसाठी फेसबुकने प्रति शेअर ३८ डॉलर किंमत निश्चित केली होती. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने तब्बल १६ अब्ज डॉलरची निधी उभारणी केली होती, ज्यामुळे तो अमेरिकेच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा आयपीओ ठरला. कंपनीचे एकूण मूल्यांकन प्रति शेअर ३८ डॉलर डॉलरच्या किंमतीनुसार सूचिबद्धतेच्या वेळी फेसबुकचे एकूण बाजार मूल्य १०४ अब्ज डॉलर एवढे प्रचंड होते. यावेळी ४२ कोटी समभाग विक्रीसाठी बाजारात आणले होते.

सूचिबद्धतेच्या दिवशी कामगिरी कशी राहिली?

सुरुवातीचा उत्साह आणि तांत्रिक अडचणी: NASDAQ स्टॉक एक्स्चेंजवर तांत्रिक बिघाडामुळे ट्रेडिंग सुरू होण्यास काही मिनिटांचा उशीर झाला होता. ट्रेडिंग सुरू होताच शेअरने ४५ डॉलरचा उच्चांक गाठला होता. सुरुवातीच्या तेजीनंतर विक्रीचा दबाव वाढला आणि पहिल्या दिवशी फेसबुकचा शेअर आपल्या मूळ किमतीच्या किंचित वर म्हणजेच $३८.२३ वर बंद झाला. पहिल्याच दिवशी तब्बल ५६० दशलक्षपेक्षा जास्त शेअर्सचे व्यवहार झाले, जो त्या काळी एका नवीन सूचिबद्ध कंपनीसाठी एक विक्रम होता.

आयपीओ नंतरची स्थिती कशी?

जरी फेसबुकने १०४ अब्ज डॉलरचे मूल्यांकन मिळवले असले, तरी सुरुवातीच्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांमध्ये कंपनीच्या ‘मोबाईल जाहिरातींमधून (Mobile Revenue) कमाई करण्याच्या क्षमतेबद्दल’ शंका व्यक्त करण्यात येत होती. यामुळे सूचिबद्धतेनंतर अवघ्या काही महिन्यांतच फेसबुकचा शेअर ५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरून १८ डॉलरच्या खाली गेला होता. मात्र, नंतरच्या काळात कंपनीने मोबाईल जाहिरातींच्या क्षेत्रात मजबूत पकड मिळवली आणि ऑगस्ट २०१३ मध्ये हा शेअर पुन्हा आपल्या ३८ डॉलरच्या मूळ किमतीच्या वर जाण्यात यशस्वी ठरला.

आता मेटाचा समभाग ६१४ अब्ज डॉलरवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअर बाजारभावानुसार कंपनीचे १.५६ लाख कोटी डॉलर आहे.

मेटाअंतर्गत खालील प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि ॲप्सचा समावेश होतो
फेसबुक (Facebook)
इन्स्टाग्राम (Instagram)
व्हॉट्सॲप (WhatsApp)
थ्रेड्स (Threads)
मेसेंजर (Messenger)
मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि संस्थापक मार्क जुकरबर्ग (Mark Zuckerberg) आहेत.