Budget 2026 Nirmala Sitharaman Saree : भारतीय केंद्रीय अर्थसंकल्पाला सुरुवात झाली असून सामान्य नागरिकांना कोणत्या विभागात दिलासा मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेल्या साडीकडेही महिला वर्गाचं लक्ष गेलं आहे. दरवर्षी निर्मला सीतारमण यांची विशेष असते. त्यामुळे यंदाही त्यांच्या साडीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यंदा त्यांनी भारतातील पारंपरिक कांजीवरम साडी नेसली आहे.

१ फेब्रुवारी २०२६रोजी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सीतारमण यांनी एक आकर्षक साडी परिधान केली आहे. ही कांजीवरम साडी असून ती हाताने विणलेली रेशमी साडी आहे. ही साडी चमकदार रंग, समृद्ध पोत आणि सोनेरी जरी बॉर्डर्ससाठी ओळखली जाते.

कांजीवरम साडी कोणत्या राज्याची?

गेल्या काही वर्षांपासून निर्मला सीतारमण यांनी आजच्या दिवसाकरत काळजीपूर्वक साडी निवडली आहे. यामुळे भारताच्या प्रादेशिक कापड परंपरा आणि स्थानिक विणकरांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन मिळेल. तामिळनाडूच्या कांजीवरम साडीला शतकानुशतके जुना वारसा आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी ती साडी परिधान करून सीतारमण यांनी केवळ भारताच्या सांस्कृतिक वारशाचे स्वागतच केले नाही तर आधुनिय आर्थिक युगा पारंपरिक कारागिरीचे मूल्यदेखील सुक्ष्मपणे अधोरेखित केले.

कांजीवरम साड्या भारतातील सर्वात प्रतिष्ठित हाताने विणलेल्या रेशमांमध्‍ये गणल्या जातात. त्यांच्या चमकदार रंगांसाठी, जाड बॉर्डर्ससाठी आणि सोनेरी जरीकामासाठी ओळखल्या जाणाही साडी भव्यता आणि टिकाऊपणाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नवव्या अर्थसंकल्पासाठी कांजीवरम साडी निवडून, निर्मला सीतारामन यांनी भारताच्या समृद्ध विणकाम परंपरा अधोरेखित केली आहे .

कांजीवरम साड्यांचं वैशिष्ट्य काय?

कांजीवरम साड्या या पारंपारिक हाताने विणलेल्या रेशमी साड्या आहेत ज्या त्यांच्या समृद्ध रेशमी कपड्यांसाठी ओळखल्या जातात, या साड्या बहुतेकदा विशेष प्रसंगी, लग्न इत्यादींमध्ये वापरल्या जातात. कांचीपुरममधील विणकर बहुतेकदा प्रसिद्ध साड्या डिझाइन करण्यासाठी समृद्ध मंदिर वास्तुकला आणि आकृतिबंधांपासून प्रेरणा घेतात. कांचीपुरमची रेशीम विणण्याची परंपरा अनेक शतकांपासूनची आहे. ९व्या-१३व्या शतकात ही कला भरभराटीला आली.