मुंबईः जगभर युद्धाचा भडका उडाला असताना शेअर बाजार हेलकावे खात आहे, अशा मंदीच्या स्थितीतही आपल्यासाठी कोणती गुंतवणूक बाजी मारेल? सोन्याची झळाळी वाढणार की चांदीची चमक सर्वांना थक्क करणार, याचा वेध घेणारा विशेष परिसंवाद गुरुवारी सायंकाळी दादरमध्ये होत आहे.
जुन्या पद्धती मोडून काढल्या जात असून कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयमुळे अनेक पारंपरिक व्यवसाय लयाला चालले आहेत. याची चिंता म्हणून शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असताना, आता त्यात आखातातील युद्ध संकटाची भर पडली आहे. अशा समयी गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा कुठे वळवावा, असा प्रश्न सतावत आहे, याचेच उत्तर तज्ज्ञांच्या माध्यमातून मिळणार आहे. गुंतवणुकीच्या नवक्षितिजांचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाच्या प्रकाशनानिमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. गुरुवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता, बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे हा कार्यक्रम योजण्यात आला आहे.
वादळी चढ-उतार हे सोने-चांदी यांसारख्या धातूंच्या किमतीतही सुरू आहेत. पेचात पाडणारी ही अस्थिरता धोक्याची घंटा आहे की संधी? याचा भविष्यवेध यानिमित्ताने वस्तू बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांच्याकडून घेतला जाईल. सध्याच्या अस्थिरतेत गुंतवणुकीची नौका बुडणार नाही आणि त्यासाठी आवश्यक शिस्तबद्ध नियोजनाचे गणित सोपे करणारी मांडणी या कार्यक्रमात आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी करतील.
या निःशुल्क कार्यक्रमात उपस्थितांना त्यांचे आर्थिक नियोजन तसेच गुंतवणूकविषयक प्रश्न-शंका हे तज्ज्ञ वक्त्यांना विचारता येतील. बरोबरीने अर्थब्रह्मचा वार्षिक अंकही सवलतीच्या दरात विकत घेता येईल.
कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.
लोकसत्ता अर्थब्रह्म : गुंतवणुकीचा कल्पवृक्ष
वक्तेः
० श्रीकांत कुवळेकर (वस्तू बाजाराचे विश्लेषक)
० कौस्तुभ जोशी (आर्थिक नियोजनकार)
कधी : गुरुवार, ५ मार्च २०२६, सायंकाळी ६.१५ वाजता
कुठे: बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व)
इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी – ९९२००९९९४३ अथवा (०२२) ६७४४०३९०/ ६७४४०२१५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
० मुख्य प्रायोजक – निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड
० सहप्रायोजक – लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड, रुणवाल रिॲल्टी
० पॉवर्ड बाय – लागू बंधू, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
० इव्हेंट पार्टनर- व्ही. मुक्ता इव्हेंट्स
अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजनांसंबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
