Gold Silver Price 2 June 2026 : सध्या भारतीय सराफा बाजारात जगाच्या उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या राजकीय तणावामुळे आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे. परिणामी, आज २ जून २०२६ रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवली गेली आहे. दुसरीकडे भारतीय सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. तर चांदीची चमक फिकी पडली आहे. ऐन सुणासुदीत मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीची स्थिती काय?
आज, मंगळवार २ जून रोजी सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. आज एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत २६० रुपयांची वाढ झाली. म्हणजे अवघ्या २ दिवसात १० ग्रॅम सोन्याची किमत ३२१० रुपयांनी महाग झाले आहे. मागील एका महिन्यात सोन्याच्या किमतीत ५.२ टक्के इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे, औद्योगिक क्षेत्रातून मागणीची अनिश्चितता वाढल्याने चांदीत सतत घसरण होत चालली आहे. २ जून रोजी चांदी ७५० रुपयांनी कोसळली. तर दोन दिवसात चांदी १२३० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
जगाच्या तुलनेत भारतात सोने महाग का?
भारतात सोन्याची खाणी जवळपास बंद आहे. परिणामी देशात विक्री होणारे सर्व सोने हे बाहेरील देशांतून आयात केले जाते. भारत दरवर्षी सुमारे ८०० ते ८५० टन सोन्याची आयात करत असेल. सध्या जागतिक संकटांमुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत तेल खरेदी करण्यासाठी भारताची परकीय गंगाजळी वेगाने रिकामी होत आहे. या परकीय चलनाचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना १ वर्ष खरेदी थांबवण्याचे आवाहन केलं. तसेच मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क दुपटीने वाढवून १५ टक्के केले आहे. या सर्वांचा परिणाम सोन्याच्या किमतींवर झाल्याने जगाच्या तुलनेत भारतात सोने महाग झाले आहे.
सोने-चांदीच्या किमतीत अस्थिरता का?
जेव्हा भू राजकीय तणाव वाढतो, तेव्हा कच्चे तेल आणि डॉलर इंडेक्स मजबूत होतात. अशा स्थितीत सोन्याला ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानले जात असले, तरी डॉलर इंडेक्स खूप मजबूत झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात सोन्यावर दबाव येतो, जो आज कॉमेक्स बाजारात घसरणीच्या रूपाने दिसत आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात रुपयाच्या कमजोरीमुळे आणि स्थानिक मागणीमुळे एमसीएक्सवर सोन्याचा भाव अजूनही १.५९ लाखांच्या वर टिकून आहे. जोपर्यंत पश्चिम आशियातील संकट निवळत नाही, तोपर्यंत कमोडिटी बाजारातील ही अस्थिरता अशीच सुरू राहील.
