Gold-Silver Price Today: देशभरात सोन्याच्या किमती ४ जुलै रोजी वाढलेल्या दिसल्या . बहुतांश शहरात सोन्याचे भाव आज चढेच आहेत. सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ४ जुलै रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून प्रमुख शहरांतील नवीन दरही समोर आले. शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 4th july 2026)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज शनिवार ४ जुलै २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,५५० तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३५,२६३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,३७,२३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३७२ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
