Gold-Silver Price Today: सोने-चांदी खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एप्रिलच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एकाच दिवसात सोन्याच्या दरात दोनदा घसरण झाली. गेल्या महिन्यात, मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी, सोन्याच्या दरात लक्षणीय बदल झाला होता. ही इतिहासातील सर्वात मोठी मानली जाणारी विक्रमी वाढ होती. एप्रिल चौथ्या दुसऱ्या दिवशी, सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. येत्या काही दिवसांत आणखी घसरण अपेक्षित आहे. चला तर मग आज ४ एप्रिल रोजी गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 4th April 2026)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ४ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,४९,४८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३७,०२३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
