Gold-Silver Price Today: ५ एप्रिल २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या दरांबाबत महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली आहे. गेल्या एका आठवड्यात या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले. राणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मागील सत्रातील घसरणीनंतर, आता सोन्याच्या दरात जोरदार सुधारणा दिसून आली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 5th April 2026)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ५ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,९३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३८,३५० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई मधील सोन्याच्या दरांवर परिणाम करणारे प्रमुख घटक कोणते
सोन्याच्या दरावर विविध घटकांचा परिणाम होत असतो. यातील प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर, यूएस डॉलरचा विनिमय दर, लग्नसराई आणि सणासुदीच्या काळ आहे. या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होते. स्थानिक राजकीय घडामोडींचा देखील सोन्याच्या दरावर परिणाम होत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढल्यास भारतातही सोन्याचे दर वाढतात. कारण सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. त्यांचा परतावा देखील चांगला येतो.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
