Gold rate today mumbai 03 october 2026: देशभरातील सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारातील तेजीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत असून, सणासुदीचा हंगाम जवळ येत असून सोनं-चांदी खरेदी करण्यास ग्राक उत्सुक आहेत. तुम्हालाही आजखरेदी करायची असेल, तर आजचे देशांतर्गत भाव जाणून घ्या..सोन्याचा आजचा ३ ऑक्टोबर रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ५०हजार २७० आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख ३७,७४८ आहे. तर चांदीचे दर २ लाख २६ हजार १८० रुपये प्रती किलो आहे.
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 03 october 2026)
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५० हजार २७० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३७ हजार ७४८ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख २६ हजार १८० रुपये
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
