Gold rate Today 04 october: सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा, लग्नसराईच्या मोसमात, सणासुदीला सोन्याचे दागिन, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं प्रत्येकाचचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात या दोन्ही धातूंनी जी उत्तुंग झेप घेतली होती, त्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं (खरेदीचं) स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका येत होती. पण सोन्याचे-चांदीचे दर जसे वर चढतात तसे खालीही येतात, गेले काही दिवस हाच ट्रेंड सुरू होता. मात्र अशातच आज ४ ऑक्टोबर २०२६ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 04 october 2026)

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५० हजार २९० रुपये

सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३७ हजार ७६६ रुपये

चांदी १ किलो भाव – २ लाख २६ हजार २०० रुपये

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.