Gold-Silver Price On 31 October 2026: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्य तोंडावरच या दोन्ही धातूंच्या किंंमती मोठी घसरण दिसून येत आहे.सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. दिवाळीपूर्वी आणि लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी स्वस्त झाल्यामुळे खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. भारतीय बाजारपेठेत मात्र सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव लक्षणीयरीत्या खाली आल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 31 October 2026)

गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. पण आजच्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.जर तुम्ही चांदीच्या वस्तू किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा ३१ ऑक्टोबर रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ३८ हजार ५८० आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख २७, ०३२ आहे. तर चांदीचे दर १ लाख ७९ हजार १०० रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ३८ हजार ५८० रुपये

सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख २७ हजार ०३२ रुपये

चांदी १ किलो भाव – १ लाख ७९ हजार १०० रुपये

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.