Gold rate today mumbai 8 August: गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. या आठवड्यात झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण आला आहे. तर दुसरीकडे गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोन्याचा आजचा ८ ऑगस्ट रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ५१ हजार ८६० आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख ३९, २०५ आहे. तर चांदीचे दर २ लाख ३२ हजार २०० रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 8 August 2026)
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५१ हजार ८६० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३९ हजार १०५ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ३१ हजार २०० रुपये
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
