Gold Silver Price : दिवाळीचा काही दिवसांवर आला असताना सोन्या-चांदीच्या बाजारातून ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज ३० ऑक्टोबर रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव २४५ रुपयांनी घसरून १,४२,३५१ रुपये प्रति १० ग्रॅम वर आला आहे, तर चांदी ५१० रुपयांनी घसरून १,८८,९४३ रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे.

भारतीय सराफा बाजार सोने-चांदीचे दर काय?

सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचा काळ चांगला मानला जात आहे. उच्चांकी दरावरुन सोन्याच्या किमती तब्बल २० टक्के घसरल्या आहेत, तर चांदीचे दर अर्ध्या किमतींहून अधिक खाली आले आहेत. शुक्रवाी ३० ऑक्टोबरला सराफा बाजारात २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे.

  • २४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,४३,९४० रुपये
  • २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,३१,९४० रुपये
  • १८ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,०७,०५० रुपये

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे दर ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मात्र, खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि प्रत्यक्ष भाव आवर्जून तपासून घ्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे स्थिती?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत ०.६७ टक्क्यांची घसरण होऊन ते ४,००४ डॉलर प्रति औंस वर आले आहे. तर चांदीचा भाव १.८२ टक्क्यांनी घसरून ५१.४२५ डॉलर प्रति औंस झाला आहे. गुरुवारीही सोन्याच्या दरात १ टक्क्याची घसरण नोंदवली गेली होती. अमेरिकेत महागाईची आकडेवारी वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोन्याची चमक फिकी पडली आहे.

फेडरल रिझर्व्हच्या धोरणांचा सोन्यावर दबाव

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेचे पीसीई महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त राहिले, तर सोन्याची किंमत ४,००० डॉलर प्रति औंसच्या खाली जाऊ शकते. यामुळे डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता अधिक बळकट होईल. सीएमई फेडवॉच टूलनुसार ट्रेडर्स डिसेंबरमध्ये व्याजदर वाढण्याची सुमारे ९० टक्के शक्यता वर्तवत आहेत. व्याजदर उच्च राहिल्यास सोन्यात गुंतवणुकीचा खर्च वाढतो, कारण त्यावर कोणतेही निश्चित व्याज मिळत नाही.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

आर्थिक विश्लेषकांच्या मते, सध्या १,४०,००० रुपयांचा स्तर सोन्यासाठी तात्काळ सपोर्ट आहे, तर १,२६,५०० ते १,४०,००० रुपये हा मजबूत सपोर्ट झोन मानला जात आहे. त्यामुळे बाजारात घसरणीवर खरेदी करण्याची रणनीती वारण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.