Gold Silver Price Drop Diwali : दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज (३ नोव्हेंबर) सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या किंमतीत १५४० रुपयांची घसरण होऊन ते १,३९,०९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, चांदीनेही मोठी गटांगळी खाल्ली असून ती ५,८९० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या प्रतिकिलोचा दर १ लाख ७८ हजार २५० रुपये झाला आहे. भारतीय शेअर बाजारातही सोने-चांदी स्वस्त झाले आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
- बुलियन वेबसाईटनुसार, मुंबई आणि चेन्नई येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,३८० रुपये प्रति १० ग्रॅम असून २२ कॅरेट सोन्याचा भाव १२७,७६0 रुपये आहे.
- राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १३९,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोने १,२७,९१० रुपयांना आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,०४,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकले जात आहे.
- कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, केरळ आणि पुणे या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा रेट १,३९,३८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
- अहमदाबाद आणि वडोदरा येथे २४ कॅरेट सोने १,३९,४३० रुपये, २२ कॅरेट सोने १,२७,८१० रुपये आणि १८ कॅरेट सोने १,०४,५९० रुपये प्रति १० ग्रॅम वर मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही मंदीचे सावट
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.७७ टक्क्यांनी घसरून ३,९३९ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर, मागील २४ तासांत चांदीच्या किमतीत २.२३ टक्क्यांची घसरण झाली आहे. चांदीचा दर ४९.७६ डॉलर प्रति औंसवर खाली आला आहे. याशिवाय, अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स ३,९५६ डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.
सोने-चांदी का घसरत आहे?
कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो. डॉलर वधारल्याने इतर चलनांमध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी सोने महाग होते, ज्यामुळे मागणी घटते.
अमेरिकन कर्ज रोख्यांमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यापेक्षा रोखे आणि सरकारी सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देत आहेत.
सोने-चांदी आणखी घसरणार की तेजी येणार?
- बाजार विश्लेषरांच्या मते, सोन्याचे गुंतवणूकदार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत. या आठवड्यात अमेरिकेत जाहीर होणारे रोजगारविषयक आकडे फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणांना आणि व्याजदरांच्या दिशेला नवी दिशा देतील, ज्यामुळे बाजाराचीपुढची चाल स्पष्ट होईल.
- जर फेडने व्याजदर वाढवले तर सोने आणखी घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेत जोपर्यंत व्याजदर उच्च पातळीवर कायम आहेत आणि फेडरल रिजर्वकडून दर कपातीबाबत स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत चांदीच्या किमतींवर दबाव कायम राहू शकतो.
