Gold-Silver Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने पुन्हा आपला रंग बदलला आहे. कालच्या घसरणीनंतर आज, १ ऑक्टोबर २०२६ रोजी, सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल झाला असून चांदीच्या दरातही बदल पाहायला मिळत आहे. दसऱ्यापूर्वी सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा भाव जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. १० ग्रॅम सोनं आणि १ किलो चांदी आज किती रुपयांना मिळत आहे? पाहूया…
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 01 October 2026)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १ ऑक्टोबर २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १४९,८८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १३७,३९० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २२६,०१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,२६० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव
| शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
| मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १३७,१४३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत १४९,६१० प्रति १० ग्रॅम आहे. |
| पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १३७,१४३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर १४९,६१० रुपये आहे. |
| नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १३७,१४३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर १४९,६१० रुपये इतका आहे. |
| नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १३७,१४३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर १४९,६१० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
