Gold-Silver Price Today: अमेरिकेतून आलेल्या महत्त्वाच्या महागाईच्या आकडेवारीचा परिणाम जागतिक मौल्यवान धातूंच्या बाजारावर दिसून आला असून, सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा मजबूत राहिल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता बळावली आहे. त्यामुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला असून, भारतातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्याचा भाव किती आहे, जाणून घेऊया…

देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 12 September 2026)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १२ सप्टेंबर २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५३,२४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४०,४७० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २३४,६५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३४७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १४०,२१३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत १५२,९६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४०,२१३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर १५२,९६० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४०,२१३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर १५२,९६० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४०,२१३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर १५२,९६० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.