Gold-Silver Price Today: दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, अनेकजण सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मात्र, सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात होणाऱ्या चढ-उतारांमुळे ग्राहकांचं लक्ष आजच्या किमतींकडे लागलं आहे. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाली आहे का? आज २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव किती आहे? तसेच चांदीच्या दरात वाढ झाली की घसरण? दसऱ्यापूर्वी सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीपूर्वी आजचे ताजे दर नक्की जाणून घ्या!

देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 16 October 2026)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,४८,५४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३६,१६२ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,१३,२५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,१३३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३५,९१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत १,४८,२७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,९१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर १,४८,२७० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,९१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर १,४८,२७० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,९१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर १,४८,२७० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

(महत्त्वाची टीप : या बातमीमध्ये दिलेले सोन्या-चांदीचे दर विविध उपलब्ध स्रोतांवरील माहितीनुसार आहेत. शहर, सराफा व्यापारी आणि बाजारातील चढ-उतारांनुसार प्रत्यक्ष दरांमध्ये फरक असू शकतो. सोन्याच्या दागिन्यांची अंतिम किंमत ठरवताना जीएसटी, घडणावळ (मेकिंग चार्जेस) आणि इतर लागू शुल्क विचारात घेतले जातात. त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील स्थानिक सराफा व्यापाऱ्याकडून त्या दिवसाचे दर आणि अंतिम किंमत निश्चित करून घ्यावी.)