Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. काल रविवारी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाल्यानंतर आज, २८ सप्टेंबर २०२६ रोजी, सोमवारी सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी बाजारातील ताज्या दरांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे…
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 28 September 2026)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २८ सप्टेंबर २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १४८,९९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १३६,५७४ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २२९,३२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३५१ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव
| शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
| मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १३६,३२७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत १४८,७२० प्रति १० ग्रॅम आहे. |
| पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १३६,३२७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर १४८,७२० रुपये आहे. |
| नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १३६,३२७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर १४८,७२० रुपये इतका आहे. |
| नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १३६,३२७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर १४८,७२० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
