Gold Silver Price Today : सणासुदीच्या कालावधीपूर्वी सोन्या-चांदीच्या किमतींकडे सर्वसामान्यांचे आणि गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष लागून राहिले आहे. सलग दोन दिवस घसरण झाल्यानंतर आज, ३० जुलै २०२६ रोजी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ नोंदवण्यात आली असून चांदीच्या भावात मात्र घसरण झाली आहे. बुलियन वेबसाईटनुसार, आज ३० जुलै २०२६, बुधवारी सोने १५० रुपयांनी वधारले आहे. चांदीचे भावे ८०० रुपयांनी घसरले आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत जवळपास ३००० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत असले तरी अजूनही उच्चांकापेक्षा स्वस्त मिळत आहे.
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 30 july 2026)
आज ३० जुलै रोजी १० ग्रॅम शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४२ हजार ९४० रुपये आहे, तर दागिन्यांसाठी वापरले जाणाऱ्या २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार ०२८ रुपये आहे. चांदीचा दर २ लाख १७ हजार ३६० रुपये प्रती किलो आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडणावर शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती शहरानुसार बदलू शकतात.
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ४२ हजार ९४० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३१ हजार ०२८ रुपये
चांदी प्रति किलोचा भाव – २ लाख १७ हजार ३६० रुपये
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
कोणत्या शहरात काय दर आहेत?
मुंबई आणि पुणे शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ५८० रुपये आहे, तर २२ कॅरेटचा भाव १ लाख ३० हजार ६९८ रुपये इतका आहे. राजधानी दिल्लीमध्ये एक तोळ्यासाठी १ लाख ४२ हजार ३३० रुपये मोजावे लागत आहेत. दागिन्यांमध्ये वापर होणारे २२ कॅरेट सोने १ लाख ३० हजार ३३० रुपये इतके आहे.
MCX वरील सोने आणि चांदीचे दर
३० जुलै, २०२६ रोजी देशांतर्गत कमोडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १,४२,२०० रुपयांवर पोहोचला. चांदीचे भाव प्रति किलोग्रॅम २,१६,७९९ रुपयांपर्यंत घसरले होते. आज, MCX वर सोन्याच्या दरात वाढ होत आहे आणि चांदीच्या दरात किंचित घट होत आहे.
आगामी काळात सोन्या-चांदीचे दर कसे असतील?
जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रणव मीर यांच्या मते, बाजाराचे लक्ष आता पश्चिम आशियातील परिस्थितीवर केंद्रित असेल. याशिवाय, युरोझोन, जपान आणि अमेरिकेतील महागाईची आकडेवारी देखील महत्त्वाची असेल. त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेच्या जीडीपीची आकडेवारी जाहीर केली जाईल. ग्राहक आत्मविश्वासाची आकडेवारीही प्रसिद्ध केली जाईल. साप्ताहिक बेरोजगार दाव्यांची आकडेवारीही महत्त्वाची असेल. याशिवाय, फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांचे व्याजदराचे निर्णय देखील सोने आणि चांदीची दिशा ठरवू शकतात.
