Gold Silver Price Today 4 August 2026 : रक्षाबंधन, गणेशोत्सव किंवा लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूत सुरू असलेल्या घसरणीला आता ब्रेक लागला असून दोन्ही धातूंचे भाव चांगलेच वधारले आहेत. आज ४ ऑगस्ट २०२६ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोने ९३० रुपयांनी महाग झाले असून चांदीच्या किमतीत तब्बल ३५९० रुपयांची वाढ झाली आहे.
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 4 August 2026)
यावर्षीच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. परिणामी मौल्यवान धातू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. मात्र, मागील ४ ते ५ महिन्यात सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली. पण, आता पुन्हा एकदा सोने-चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याचा आजचा ४ ऑगस्ट रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ४३ हजार ९३० रुपये आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख ३१ हजार ९३६ रुपये आहे. तर चांदीचे दर २ लाख २० हजार ७९० रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ४३ हजार १६० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३१ हजार ९३६ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख २० हजार ७९० रुपये
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
खरेदीचा ट्रेंड बदलला
- वर्षभरात सोने-चांदीच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ग्राहकांचा खरेदी ट्रेंड बदलताना पाहायला मिळत आहे. वाढत्या दरांमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी १५ टक्क्यांनी घसरून ७५.१ टनांवर आली आहे. ग्राहकांनी कमी वजनाचे किंवा कमी कॅरेटचे दागिने खरेदी करण्यावर अधिक भर दिला.
- सोन्यातील गुंतवणुकीचा कल वाढला असून सोन्याची नाणी आणि बार (Bar & Coin) यांची मागणी ९ टक्क्यांनी वाढून ५०.३ टनांवर पोहोचली आहे.गोल्ड ईटीएफचा (ETF) विस्तार: डिजिटल सुवर्ण गुंतवणुकीच्या पर्यायांनाही चांगला प्रतिसाद मिळाला असून गोल्ड ईटीएफमधील मागणी ४९ टक्क्यांनी वाढून ४.२ टन झाली आहे.
