Gold-Silver Price Today: सर्व सामान्यांना स्वस्तात दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या घसरणीमुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, शनिवारी सोन्याचे भाव घसरले आहेत. सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 18 july 2026)

गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. पण आजच्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.जर तुम्ही चांदीच्या वस्तू किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा १८ जुलै रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ४१ हजार ३५० आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख २९,५७१ आहे. तर चांदीचे दर २ लाख १६ हजार ४५० रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ४१ हजार ३५० रुपये

सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख २९ हजार ५७१ रुपये

चांदी १ किलो भाव – २ लाख १६ हजार ४५० रुपये

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.