Gold Silver Rate Marathi Today : अमेरिका-इराण शांतता करार आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात ९८० रुपयांची घसरण झाली असून चांदी ३००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मात्र, या घसरणीनंतरही आठवड्याभरात मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमती कोसळल्यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

बुलियन वेबसाईटनुसार, आज (७ जुलै २०२६) सोने ९८० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १,४६,४३० रुपये इतका झाला आहे. दुसरीकडे, चांदीत ३००० रुपयांची मोठी घसरण झाली. आता चांदीचा प्रतिकिलो दर २,३६,७४० रुपये इतका झाला आहे.

आठवड्यात सोने-चांदी वधारली

जरी आजच्या दिवसात दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव घसरलेले दिसले, तरी संपूर्ण आठवड्याचा कल पाहिला असता दोन्ही धातूंच्या किमती वधारल्या आहेत. गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात तब्बल ३,४८० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजची किरकोळ घसरण वगळता सोने खरेदीदारांसाठी चालू आठवडा महागडाच राहिला आहे. सतत घसरणाऱ्या चांदीच्या किंमतही गेल्या आठवड्यात मोठी तेजी पाहायला मिळाली. आठवडाभरात चांदीची किंमत तब्बल ४,७३० रुपयांनी वधारली आहे.

नोंद : वरील नमूद केलेले दर हे सराफा बाजारातील मूलभूत किमतींवर आधारित आहेत. या दरांवर स्थानिक स्तरावर जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेस (घडणावळळ शुल्क) लागू होत असल्याने, तुमच्या शहरातील प्रत्यक्ष दागिन्यांचे भाव थोडे वेगळे असू शकतात.

सोने-चांदीचे दर का वाढले?

जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव आणि डॉलरच्या मूल्यात होणारे बदल यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारा कल वाढला आहे. परिणामी, स्थानिक बाजारात ही मोठी दरवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आता पुढील काही दिवसांत बाजारातील ही तेजी अशीच टिकून राहते की नफावसुलीमुळे दरांमध्ये पुन्हा दुरुस्ती होते, याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे आहे, की दीर्घकाळात सोन्याच्या किमती वाढतच जाणार आहेत, त्यामुळे प्रत्येक घसरणीत खरेदी करावी.