Jeffrey Sachs India China Economy Prediction: या शतकाच्या शेवटी भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीन मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असे भाकीत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जेफ्री डी. सॅक्स यांनी म्हटले आहे.

वाराणसी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आधुनिक आव्हानांसाठी प्राचीन शहाणपण’ (Ancient Wisdom for Modern Challenges) या विषयावरील जागतिक परिसंवादात बोलताना सॅक्स म्हणाले की, जगाने आता अशा बहुध्रुवीय युगात प्रवेश काला आहे, जिथे विविध प्रदेशांमधील संस्कृती, विचार, इतिहास आणि अस्मिता समजून घेणे आवश्यक आहे. “कोणताही एक प्रदेश किंवा कोणताही एक देश जगावर वर्चस्व गाजवणार नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले.

अदाणी समूहाचे योगदान

त्यानंतरच्या संवादांमध्ये, सॅक्स यांनी अदाणी समूहाचा भारतातील बदल आणि प्रगतीच्या प्रमुख चालकांपैकी एक म्हणून उल्लेख केला आणि देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

जेफ्री डी. सॅक्स पुढे कौटुंबिक मालकीच्या आणि कौटुंबिक नेतृत्वाखालील उद्योगांच्या विशिष्ट जबाबदाऱ्यांकडेही लक्ष वेधले आणि असा युक्तिवाद केला की, कुटुंबाच्या नावाने व्यवसाय करणारे व्यावसायिक हितसंबंधांपेक्षा अधिक काहीतरी दर्शवतात. ते त्यांची मूल्ये, वारसा आणि समाजाप्रती असलेली कर्तव्ये देखील सोबत घेऊन चालतात. ते म्हणाले की, अशा व्यवसायांनी ज्या समुदायांमध्ये ते कार्यरत आहेत, त्यांना ते काय परत देतात याचा विचार केला पाहिजे.

कंपन्यांचा नफा आणि सामाजिक जबाबदारी

कंपन्यांचा नफा आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील तणावावर भाष्य करताना, सॅक्स यांनी युनिलिव्हरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल पोलमन यांच्या अनुभवाचा दाखला दिला. पोलमन यांनी या ग्राहक वस्तू कंपनीला एक ‘सामाजिक जबाबदारी असलेली संस्था’ म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना भागधारक, गुंतवणूकदार आणि आर्थिक परताव्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विश्लेषकांकडून विरोधाचा सामना करावा लागला.

एआयबाबत चिंता

त्यांनी अँथ्रोपिक आणि मोठ्या कंपन्यांच्या आयपीओच्या संभाव्य शक्यतेचा संदर्भ देत, एआय उद्योगातील व्यावसायिक महत्त्वाकांक्षा आणि सार्वजनिक सुरक्षा यांच्यातील संतुलनाबद्दलही चिंता व्यक्त केली.

या तंत्रज्ञानाशी संबंधित संभाव्य विनाशकारी परिणामांबद्दल अँथ्रोपिकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष वेधत, सॅक्स यांनी प्रश्न उपस्थित केला की, प्रगत एआयमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना सामोरे जाण्यापेक्षा मोठ्या कंपन्यांच्या आयपीओ आणि व्यावसायिक विस्ताराकडे का जास्त लक्ष दिले जात आहे?