John Abraham Bandra Property : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याला अनेकजण केवळ दमदार अभिनय आणि फिटनेससाठी ओळखतात. मात्र, याव्यतिरिक्त जॉनला व्यवसायात मोठी रुची असलेली पाहायला मिळते. हे सांगण्याचे कारण म्हणजे जॉन अब्राहम पुन्हा एकदा रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठ्या व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. जॉनने मुंबईतील अतिशय पॉश आणि महागडा भाग मानल्या जाणाऱ्या बांद्रा वेस्ट येथील सेंट मार्टिन रोडवर तब्बल एक आलीशान प्रॉपर्टी खरेदी केली आहे. जॉनने केवळ या घरासाठी ५ कोटी रुपयांहून अधिक स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
८४ कोटींच्या प्रॉपर्टीत नेमके काय आहे?
‘लायसेस फोरस’च्या अहवालानुसार, जॉनने ही मालमसत्ता तब्बल ८४ कोटी रुपयांनी खरेदी केली आहे. १,०१७.६० स्क्वेअर मीटर क्षेत्रफळात हा संपूर्ण परिसर पसरलेला आहे. मुख्य बंगल्याचे बांधकाम १९३.१२ स्क्वेअर मीटरमध्ये आहे. तर आलीशान बंगल्याच्या मागे ३१.५० मीटरचा स्वतंत्र आऊटहाऊस देखील आहे. १४ जुलै २०२६ रोजी या घराचे अधिकृत रजिस्ट्रेशन करण्यात आले. ८४ कोटींच्या या व्यवहारासाठई जॉनने ५.०४ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून सरकारी तिजोरीत जमा केले आहेत.
तीन वर्षांत दुसरी मोठी रिअल इस्टेट खरेदी!
जॉन अब्राहमने रिअल इस्टेटमध्ये केलेली ही पहिलीच मोठी गुंतवणूक नाही. यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये त्याने मुंबईतील खार भागात ७०.८३ कोटी रुपयांचा एक अत्यंत प्रीमियम लग्झरी अपार्टमेंट खरेदी केलं होतं. ‘इंडेक्सटॅप’च्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत जॉनने मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी रिअल इस्टेट मालमत्ता जमा करण्यावर विशेष भर दिला आहे.
केवळ अभिनेता नाही, तर हुशार बिसनेसमन!
बॉलिवूडमध्ये चित्रपट करण्यासोबतच जॉन अब्राहम हा एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉनकडे सध्या अंदाजे २५१ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. त्याने विविध व्यवसाय आणि स्टार्ट-अप्समध्ये पैसे गुंतवून कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे.
कलाकारांचे रिअल इस्टेट प्रेम
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारा जॉन पहिलाच कलाकार नाही. गेल्याच महिन्यात अभिनेता रणबीर कपूर याने पुण्यातील मुळशी तालुक्यात २५ एकर जमीन खरेदी केली. तर, शाहरुख खान याने दिल्लीतील एक रहिवासी इमारतीत एक संपूर्ण प्लोअर खरेदी केल्याचे वृत्त समोर आले होते. याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनीही अलिकडेच अयोध्येत एक भूखंड खरेदी केला आहे.
