मुंबई : जागतिक युद्धाचे सावट आणि शेअर बाजाराच्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा अस्थिर वातावरणात केवळ बचतीवर अवलंबून न राहता, आपल्या उत्पन्नाला जोड देणारे नवीन मार्ग शोधणे आवश्यक बनले आहे. म्हणूनच सोन्या-चांदीच्या दरातील ऐतिहासिक तेजीचा फायदा घेऊन स्वतःचा आर्थिक कणा कसा मजबूत करता येईल, याचे विश्लेषण करणारे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे खास सत्र गुरुवारी सायंकाळी दादरमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

युद्धाच्या या भडक्यात गुंतवणुकीचा कोणता धातू हा कमाईची सर्वाधिक संधी देईल आणि सामान्यांसाठी समांतर उत्पन्नाचा स्रोत बनेल, याचा मागोवा घेणारा हा विशेष परिसंवाद ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाच्या प्रकाशनानिमित्ताने होत आहे. गुरुवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता, बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे हा कार्यक्रम योजण्यात आला आहे.

सध्याच्या वातावरण शेअर्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि सुरू असलेल्या ‘एसआयपी’बद्दल काय निर्णय घ्यावा. आर्थिक नियोजनाचा फेरविचार करावा तर कसा? या प्रश्नांचा वेध आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी हे घेतील. तर समांतर उत्पन्नासाठी ‘डिजिटल गोल्ड’ की ‘सिल्व्हर एसआयपी’ अथवा अन्य कोणता मार्ग उपकारक ठरेल, याचे विश्लेषण वस्तू बाजाराचे विश्लेषक श्रीकांत कुवळेकर हे करतील.

या निःशुल्क कार्यक्रमात उपस्थितांना तज्ज्ञ वक्त्यांना त्यांचे आर्थिक नियोजन तसेच गुंतवणूकविषयक प्रश्न-शंका विचारता येतील. गुंतवणुकीच्या नवक्षितिजांचे समग्र मार्गदर्शन असलेला ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चा वार्षिक अंकही या ठिकाणी विकत घेता येईल.

कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला असून, प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य असेल.

वक्तेः
० श्रीकांत कुवळेकर (वस्तू बाजाराचे विश्लेषक)
० कौस्तुभ जोशी (आर्थिक नियोजनकार)

कधी : गुरुवार, ५ मार्च २०२६, सायंकाळी ६.१५ वाजता

कुठे: बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व)

इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी – ९९२००९९९४३ अथवा (०२२) ६७४४०३९०/ ६७४४०२१५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजनांसंबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.