मुंबई : जपानमधील आघाडीची बँक असलेल्या मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप बँकेने (एमयूएफजी) श्रीराम फायनान्समध्ये ३९,६१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि या माध्यमातून सुमारे २० टक्के हिस्सेदारी मिळवत असल्याचे बुधवारी जाहीर केले.
देशाच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आहे. श्रीराम फायनान्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, प्राधान्य समभागांद्वारे एमयूएफजी बँकेला समभागांचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनंतरच हा व्यवहार पूर्णत्वाला गेला आहे. एमयूएफजीने प्रति समभाग ८४०.९३ रुपये या दराने ४७.११ कोटी समभाग खरेदी केले आहेत. भारतीय स्पर्धा आयोगाच्या अर्थात सीसीआयच्या मंजुरीसह, सर्व आवश्यक नियामक आणि वैधानिक परवानग्या प्राप्त केल्यानंतरच ही गुंतवणूक करण्यात आली.
या गुंतवणुकीमुळे कंपनीचा भांडवली पाया अधिक भक्कम झाला असून, प्रमुख व्यवसाय क्षेत्रांमध्ये वेगाने वाढ साधता येणे शक्य होणार आहे, असे श्रीराम फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले. हा ऐतिहासिक व्यवहार कंपनीच्या दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्याची ठोस सुरुवात आहे. यामुळे नवनिर्मितीला चालना मिळेल, किफायतशीर व विविध स्रोतांतून निधी उपलब्ध होईल आणि जोखीम व्यवस्थापनातील जागतिक दर्जाच्या पद्धतींचा अवलंब करता येईल, असे ते म्हणाले.
श्रीराम फायनान्ससोबतचे सहकार्य सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील MSME आणि रिटेल क्षेत्रात मोठी क्षमता असून, SFL मजबूत पाया असलेली संस्था आहे. ही गुंतवणूक भारताबद्दलच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आमच्या जागतिक अनुभव आणि नेटवर्कच्या जोरावर आम्ही SFL च्या शाश्वत वाढीस सक्रिय पाठबळ देऊ., असे एमयूएफजीचे अध्यक्ष आणि ग्रुप मुख्याधिकारी जुनिची हान्झावा म्हणाले,
समभागाची १० टक्क्यांची उसळी
श्रीराम फायनान्सचा समभाग बुधवारच्या सत्रात ९.९४ टक्क्यांनी म्हणजेच ९२.५५ रुपयांनी वधारून १,०२३.३० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, कंपनीचे १,९२,५२१ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.
क्रम कसा?
Mitsubishi UFJ Financial Group (MUFG) ने श्रीराम फायनान्स लिमिटेड मध्ये २० टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली
व्यवहाराची किंमत ~₹३९,६०० कोटी ($४.४अब्ज)
हा भारताच्या वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठा सीमापार गुंतवणूक व्यवहार असल्याचे जाहीर
? २० डिसेंबर २०२५ — करार व बोर्ड मंजुरी
श्रीराम फायनान्सच्या बोर्डाने प्रेफरेंशियल इश्यूद्वारे शेअर्स जारी करण्यास मंजुरी दिली
MUFG बँकेसोबत औपचारिक गुंतवणूक करार (Investment Agreement) झाला
? जानेवारी २०२६ — भागधारकांची मंजुरी
१४ जानेवारी २०१६ रोजी शेअरहोल्डर्सनी मोठ्या बहुमताने प्रस्ताव मंजूर केला
MUFG ला शेअर्स वाटप आणि बोर्डवर प्रतिनिधित्व देण्यास हिरवा कंदील
? जानेवारी–मार्च २०२६ — नियामक प्रक्रिया
व्यवहारासाठी आवश्यक मंजुऱ्या:
RBI CCI (Competition Commission of India)
कंपनी व्यवस्थापनाने २-३महिन्यांत व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला
? एप्रिल 2026 — व्यवहार पूर्ण (Completion)
सर्व मंजुऱ्यांनंतर MUFG बँकेने ₹३९,६१८ कोटींची गुंतवणूक पूर्ण केली
MUFG कडे श्रीराम फायनान्समध्ये २० टक्के इक्विटी हिस्सा आला
व्यवहार अधिकृतपणे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी वित्तीय गुंतवणूक म्हणून नोंदवला गेला
