मुंबईः सर्वांसाठी पसंतीची व तुलनेने सोपी असलेली सोने गुंतवणूक ही आता भारतात एका अत्यंत आधुनिक आणि फायदेशीर वळणावर आली आहे. कपाटात अथवा लॉकरमध्ये पडून राहणारी ही मालमत्ता आता, ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स’ अर्थात ईजीआरमुळे, शेअर्स प्रमाणेच ॲक्टिव्ह आणि लिक्विड मालमत्ता बनेल, इतकेच नव्हे तर या गुंतवणुकीला दुहेरी परतावा देणारी देखीलती बनवेल.
सामान्य गुंतवणूक दाराला‘ईजीआर’च्या माध्यमातून अगदी छोट्या रकमेतूनही शुद्ध सोन्यात त्यांच्या डिमॅट खात्याद्वारे सुरक्षित गुंतवणूक करता येईल. संपूर्ण देशात सोन्याचा एकच, अचूक आणि पारदर्शक भाव ठरवण्यास या यंत्रणेमुळे मदत होईल. यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबेल, शिवाय खात्यातील‘ ईजीआर’चे विमोचन करून ते त्या बदल्यात अगदी सहज पणे प्रत्यक्ष शुद्ध सोने जेव्हा गरज पडेल तेव्हा विनाविलंब परत मिळवू शकतील.
मात्र सर्वात मोठा फायदा हा उत्पादक परता व्याचाआहे. सामान्यतःआपण जेव्हा घरात किंवा लॉकरमध्ये दागिने, नाणी अथवा वळी या रूपात सोने ठेवतो, तेव्हा त्यावर आपल्याला कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही. मात्र, ‘ईजीआर’च्या स्वरूपातील डिजिटल सोन्याचा वापर हा शेअर्स प्रमाणेच वेगवेगळ्या वित्तीय व्यवहारांसाठी करता येऊ शकतो, असे डिजिटल गोल्ड क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आणि नामांकित रिफायनरी असलेल्या ऑगमॉन्ट एंटरप्राइजेसचे संस्थापक पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले.
देशातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या‘एनएसई’ने आता ऑगमॉन्टशीहात मिळवणी करत भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स बाजार पेठेचा विस्तार करण्याचे निश्चित केले आहे.‘सेबी’द्वारे नियामक मंजुरीनंतर, ‘एनएसई’नेमे२०२६मध्ये या नवीन गुंतवणूक पर्यायाचे अनावरण केले. तरी जीएसटीची गुंतागुंत आणि पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे हा पर्याय प्रत्यक्षातअजून वेग घेऊ शकलेला नाही. मात्र आता सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि सराफा व्यापाऱ्यांनाथेट डिजिटल स्वरूपात सोन्याची सुरक्षित खरेदी-विक्री करणे सोपेजाईल. परिणामी, भारतातील सोन्याच्या बाजारात अधिक पारदर्शकता आणि तरलता येईल, असा विश्वास उभयतांकडून व्यक्त करण्यात आला.
दुहेरी परतावा खालीलप्रमाणे
१. सोने भाड्याने देऊन अतिरिक्त कमाई शक्य होईल
सोप्याभाषेत सांगायचे तर, जसे आपण आपले घर भाड्याने देऊन दर महाभाडे कमावतो, तसेच गुंतवणूकदार आपले‘ईजीआर’ (डिजिटल सोने) बाजारातील इतर घटकांना ठराविक काळासाठी भाड्याने देऊ शकतात. या प्रक्रियेला वित्तीय भाषेतएसएलबी (सिक्युरिटी लेंडिंग अँडबोरोइंग) म्हटले जाते. याद्वारे सोन्यातील गुंतवणूक मूल्य जसेच्या तसे राहतेच, शिवाय ते भाड्याने दिल्या बद्दल तुम्हाला अतिरिक्त व्याज मिळते. कोठारी यांच्या मते, हे व्याज ५ ते ६ टक्के दरा पर्यंत जाऊ शकते.
२. कर्ज मिळवण्यासाठी‘ तारण’म्हणून वापर
जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज भासली किंवा शेअर बाजारात इतर व्यवहारांसाठी मार्जिन हवे असेल, तर तुम्ही तुमचे‘ईजीआर’ तारण म्हणून ठेवू शकता.‘ईजीआर’युनिट्स0च्या बदल्यात अगदी गोल्ड लोनसारखेच कर्ज बँकांकडून मिळेल. मात्र बँकेत प्रत्यक्ष सोने नेऊन, त्याची शुद्धता तपासून घेण्याची कटकट न राहता, कर्ज मिळवण्याचा हा डिजिटल पर्याय अत्यंत वेगवान आणि सुटसुटीत मार्ग आहे.
३. नेहमीच्या‘ॲप्स’वर ट्रेडिंग शक्य
गुंतवणूकदारांना ‘ईजीआर’ खरेदी-विक्रीसाठी कोणत्याही नवीन मंचावरनोंदणीसाठीजाण्याची गरज नाही. शेअर्स किंवा म्युच्युअलफंडासाठी वापरात येणारे नियमित मोबाईल ॲप्स(उदा. झिरोधा, ग्रो, एंजल वन वगैरे.) तुमच्याकडे असल्यास, त्याच ॲप्सच्या माध्यमातून अगदी सहजपणे ईजीआरचा व्यापार (ट्रेड) करता येऊशकतो.
