मुंबईः आजच्या युगात पैशांचे आरोग्य आणि गुंतवणुकीची तंदुरुस्ती जोखणे हे शारीरिक तब्येतीची काळजी घेण्याइतकेच जरूरीचे आहे. त्याचीच एक शास्त्रशुद्ध पद्धत असलेल्या ‘वेल्थ चेकअप’ची संधी ही रविवारी सायंकाळी विलेपार्ले येथे योजण्यात आलेल्या ‘लोकसत्ता अर्थभान’च्या खास सत्राने सर्वांसाठी खुली केली आहे.
अर्थविषयाचे अभ्यासक डॉ. वीरेंद्र ताटके हे या पैशांच्या आरोग्य तपासणीचे सत्र हाताळणार आहेत. पैसा हाती खुळखळतो पण टिकत नाही अशांसाठी पैशाला योग्य वळण लावण्याचे, तर अगदी थोड्या थोडक्या बचतीतून संपत्ती निर्माण करता येणे कसे शक्य आहे, हे ते उदाहरणांसह समजावून सांगतील. बाजारातील बदलांप्रमाणे, परतावा, जोखीम आणि पोर्टफोलिओच्या फेरविचाराच्या दृष्टीने हे ‘वेल्थ चेकअप’ गुरूकिल्लीच ठरेल.
बरोबरीने गुंतवणुकीतील शिस्तीसह, अडीअडचणीला कामी येणाऱ्या कर्जाबाबत शिस्तीचे महत्त्व हे ट्रान्सयुनियन सिबिलचे मुख्य वित्तीय अधिकारी निखिल राजाध्यक्ष हे सांगतील. आपल्या आर्थिक वर्तनाची कुंडली असलेला हा सिबिल स्कोअर म्हणजे नेमका काय? तो कमी झाला तर काय होते आणि मग वाढवावा कसा याचा उलगडा ते करतील.
गुंतवणूक साक्षरतेचा भाग म्हणून होत असलेल्या या कार्यक्रमाचे ‘आदित्य बिर्ला सन लाइफ मुच्युअल फंड’ मुख्य प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम रविवार, ८ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ६.०० वाजता, लोकमान्य सेवा संघ, पु.ल. देशपांडे सभागृह, ३ रा मजला, विलेपार्ले (पू) येथे होत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, उपस्थितांना सिबिल स्कोअर आणि गुंतवणूक नियोजनाविषयी शंका व प्रश्न तज्ज्ञांना थेट विचारता येतील.
गुंतवणूक नियोजन आणि आर्थिक आरोग्य तपासणी – डॉ. वीरेंद्र ताटके (अर्थ विषयाचे अभ्यासक)
वैयक्तिक पत कशी तपासावी?
निखिल राजाध्यक्ष (मुख्य वित्तीय अधिकारी, सिबिल)
- कुठे: लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे सभागृह, ३ रा मजला, विलेपार्ले (पू.)
- कधी : रविवार, ८ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ६.०० वाजता
- कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून, इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी – ९९२००९९९४३, (०२२) ६७४४०३७६, (०२२) ६७४४०२१५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
- अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

