PNG Jewellers / पुणे : भारतातील सुवर्ण उद्योगामध्ये नैतिक आणि जबाबदार व्यावसायिक पद्धतींचे सर्वोच्च मानक इंडियन असोसिएशन फॉर गोल्ड एक्सलन्स अँड स्टँडर्ड्स (आयएजीईएस) स्थापित करण्यात येत आहे. या मोहिमेत आता आघाडीचा सराफी ब्रँड पीएनजी ज्वेलर्स (पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लि.) सामील झाला असून, त्यांना प्रतिष्ठेचे आयएजीईएस मानांकन मिळाले आहे.
आयएजीईएस ही भारतीय सुवर्ण उद्योगासाठी आणि उद्योगाद्वारेच स्थापन केलेली ‘स्व-नियामक संस्था’ आहे. सोने शुद्धीकरण, बुलियन ट्रेडिंग, उत्पादन, हॉलमार्किंग, किरकोळ विक्री आणि डिजिटल गोल्ड अशा संपूर्ण साखळीत एकसमान मानके निश्चित करण्याचे काम ही संस्था करते.
सुमारे १९४ वर्षांचा वारसा लाभलेले पीएनजी ज्वेलर्स हे देशातील सर्वात जुन्या सराफी पेढ्यांपैकी एक आहे. पीएनजी ज्वेलर्सने स्वतंत्र त्रयस्थ संस्थेद्वारे केलेल्या काटेकोर तपासणीनंतर हे मानांकन मिळवले आहे. याबाबत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, प्रत्येक दशकात आमचे उद्दिष्ट कामकाजातील पारदर्शकता, प्रक्रियेची अखंडता आणि जबाबदार स्त्रोत पद्धती हेच राहिले आहे. आयएजीईएस मानांकन आमच्या अंतर्गत मानकांची पुष्टी करते. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतातील सर्व सुवर्ण संस्थांनी हे मानांकन मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
आयएजीईएसचे मुख्याधिकारी कौशलेंद्र सिन्हा म्हणाले की, आम्ही पीएनजी ज्वेलर्सचे आयएजीईएस नेटवर्कमध्ये स्वागत करतो. त्यांच्या प्रदीर्घ वारशात या मानांकनामुळे विश्वासाचा आणखी एक स्तर जोडला गेला आहे. भारतात सोने हे केवळ धातू नसून भावनांशी जोडलेले आहे, अशा वेळी ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह चौकट असणे गरजेचे होते, जी उणीव आयएजीईएस भरून काढत आहे.
उद्योग अधिक संघटित मोठे ब्रँड्स आयएजीईएस सोबत जोडले जात असून, भारतीय सुवर्ण उद्योग अधिक संघटित आणि विश्वासार्ह होत आहे. सध्या आयएजीईएसतर्फे #PehlaCheckIAGES ही देशव्यापी मोहीम राबवली जात आहे. याद्वारे ग्राहकांना सोने खरेदी करण्यापूर्वी संबंधित सराफाकडे आयएजीईएस मानांकन आहे का, हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

