पुणे: आघाडीची सराफ पेढी असलेल्या रांका ज्वेलर्सच्या १६व्या दालनाचे भोसरी, आळंदी रोड येथे बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. तब्बल १४७ वर्षांची परंपरा असलेल्या रांका ज्वेलर्सने नव्या दालनाच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत, तसेच जुन्या दागिन्यांच्या १०० टक्के एक्सचेंज मूल्यावर नवीन डिझाईनचे मनमोहक दागिने खरेदी करण्याची संधी उपलब्ध दिली आहे.

ही योजना ११ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत फक्त भोसरी, आळंदी रोड येथील दालनामध्ये केलेल्या खरेदीला लागू आहे. दालनाच्या उद्घाटनप्रसंगी फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, डॉ. रमेश रांका, अनिल रांका, तेजपाल रांका, वस्तुपाल रांका, शैलेश रांका, श्रेयस रांका, मानव रांका, श्लोक रांका, ऋषभ रांका व विवान रांका उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रांका ज्वेलर्सच्या भोसरी आळंदी रोड शोरूम ला भेट दिली. याप्रसंगी हे शोरूम रांकांच्या परंपरेला धरूनच प्रशस्त असणार आहे ही माझी कल्पना खरी ठरली तसेच 147 वर्षांची ही सुवर्णपेढी आज सचोटीने व्यवसाय करत आहे आणि त्यासोबतच त्यांचे सामाजिक योगदानही खूप मोठे आहे या शब्दात त्यांनी रांका परिवाराचे कौतुक केले . या सोळाव्या शोरूमलाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी रांका ज्वेलर्सच्या नवीन दालनासह, भोसरीतील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भोसरी येथील दालन घडविण्यामध्ये डॉ. रमेश रांका व मोनिका रांका यांचा सिंहाचा वाटा आहे. मोनिका स्वतः जेमोलॉजिस्ट असून या क्षेत्रात त्यांना २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. रांका ज्वेलर्सच्या व्यवसायाचा प्रारंभ रविवार पेठ येथील दालनाने सुरूवात होऊन थोड्याच कालावधीत लक्ष्मी रोड, कर्वे रोड, पिंपरी चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, सातारा रोड, बंडगार्डन, बाणेर, ठाणे (मुंबई), पिंपळे सौदागर, कोंढवा, खराडी, वाघोली, चाकण आणि आता भोसरी अशी एकूण १६ दालने कार्यरत आहेत.

नव्याने सुरू झालेल्या या सुवर्णदालनात एकाच छताखाली सुवर्ण व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारच्या पारंपारिक दागिन्यां व्यतिरिक्त आधुनिक युगातील युवक युवतींच्या पसंतीचे, कमी वजनाचे, योग्य किंमतीचे सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीची सुविधा उपलब्ध आहे