RBI Governor Sanjay Malhotra UPI MDR Fee Statement: रिझर्व्ह बँक इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी बुधवारी सांगितले की, निवडक यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू केल्यामुळे यूपीआय व्यवहारांच्या संख्येवर कोणताही मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही.

“मर्चंट डिस्काउंट रेटबाबत निर्णय आधीच घेण्यात आला आहे. सध्या तरी आम्हाला यूपीआय व्यवहारांच्या संख्येत कोणतीही घट दिसून आलेली नाही आणि मला वैयक्तिकरित्या असे वाटत नाही की एखाद्या अल्प शुल्काचा व्यवहारांच्या संख्येवर मोठा परिणाम होईल”, असे मल्होत्रा ​​म्हणाले.

१५ ऑक्टोबरपासून नवीन मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केले आहे. या नव्या शुल्कानुसार, पर्सन-टू-मर्चंट यूपीआय व्यवहारांवर ०.४% शुल्क आकारले जाईल. हे शुल्क २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांना लागू असेल, तर ७५,००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी एमडीआरची कमाल मर्यादा ३०० रुपये इतकी असेल.

डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून जे शुल्क आकारले जाते, त्याला मर्चंट डिस्काउंट रेट असे म्हणतात. मात्र, यात महत्त्वाचा बदल असा आहे की, हे शुल्क ग्राहकांवर लादले जाणार नाही.

अर्थ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांसाठी यूपीआय पेमेंटची सुविधा यापुढेही मोफत राहील. तसेच, व्यापाऱ्यांना मर्चंट डिस्काउंट रेजचा बोजा ग्राहकांवर टाकता येणार नाही. याचा अर्थ असा की, खरेदीदारांनी केवळ दर्शविलेली किंवा जाहीर केलेली किंमतच देणे अपेक्षित आहे.

१५ ऑक्टोबरपासून काय बदल होणार?

नवीन मर्चंट डिस्काउंट रेट केवळ २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र पर्सन-टू-मर्चंट व्यवहारांना लागू होईल. २ हाजर रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर कोणतेही नवीन शुल्क आकारले जाणार नाही. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, एकूण पर्सन-टू-मर्चंट यूपीआय व्यवहारांपैकी ९५% पेक्षा जास्त व्यवहार याच श्रेणीत येतात. या नव्या नियम

उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने ५०,००० रुपयांचे यूपीआय पेमेंट केले, तर ०.४% दराने मर्चंट डिस्काउंट रेटची रक्कम २०० रुपये होईल. ही रक्कम व्यापाऱ्याला भरावी लागेल आणि ती ग्राहकाच्या बिलात जोडली जाणार नाही. त्याचप्रमाणे, १ लाख रुपयांच्या व्यवहारावर रक्कम ४०० रुपयांऐवजी ३०० रुपयांपर्यंतचे शुल्क मर्यादित असेल.