Robert Kiyosaki shares financial crisis investment advice and book recommendation: रॉबर्ट कियोसाकी यांनी बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना एक नवीन पुस्तक सुचवले आहे. याचबरोबर त्यांनी बिटकॉइन आणि कमोडिटीजसारख्या पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकींपासून दूर राहण्याचे आवाहन देखील केले आहे.
कियोसाकी यांनी एक्सवर आपल्या फॉलोअर्सना केलेली ही शिफारस मालमत्ता नसून, आर्थिक संकट आणि संपत्तीचे हस्तांतरण याबद्दलचे एक पुस्तक आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये, कियोसाकी यांनी मिकी एम. मैनी यांचे “द एन्ट्रॉपी ट्रॅप” हे पुस्तक बाजारातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचने अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.
या पुस्तकाची प्रस्तावना जिम रिकार्ड्स यांनी लिहिली आहे. रिकार्ड्स हे एक असे नाव आहे ज्यांचा उल्लेख कियोसाकी अनेकदा करतात. शिवाय, जगभरात पारंपरिक आर्थिक प्रणालींवरील विश्वास हळूहळू कमी होत असताना, केवळ विश्वासावर आधारित मालमत्ता कशा प्रकारे कोसळू शकतात, हे या पुस्तकातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
या मालमत्तांमध्ये विशिष्ट आर्थिक साधनांचा समावेश होतो. यासाठी कियोसाकी यांनी अमेरिकन रोखे, ईटीएफ, आणि म्युच्युअल फंड्सची उदाहरणे दिली, जी पूर्णपणे विश्वासावर आधारित असतात. शिवाय, त्यांचा असा युक्तिवाद आहे की, एकदा का या प्रणालीवरील विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला, तर या मालमत्तांचे मूल्य कोसळू शकते.
“आज आपण पाहू शकतो की जपानसारख्या मोठ्या रोखे धारकांनी अमेरिकन रोखे विकायला सुरुवात केली आहे. ज्यांना पुढे काय घडणार आहे आणि कोणती मालमत्ता बाळगायची आहे याची जाण आहे. त्यामुळे तेच जगातील नवीन श्रीमंत बनतील”, असे कियोसाकी यांनी एक्स वर म्हटले आहे.
मी चुकीचा होतो
जून २०२६ च्या शेवटी सोन्याच्या किमती ५,६०० डॉलर्सच्या आसपासच्या उच्चांकावरून घसरून ४,००० डॉलर्सच्या पातळीकडे आल्या. त्यानंतर कियोसाकी यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले होते, “मी चुकीचा होतो. सोन्याचे भाव अजूनही पडत आहेत. हेच वास्तव आहे.”
असे असले तरी कियोसाकी सोन्याच्या बाबतीत आपल्या दीर्घकालीन भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी पाच वर्षांच्या आत सोन्याच्या किमती ३५,००० डॉलर्सपर्यंत जातील असे म्हटले आहे. शिवाय, त्यांनी यावर जोर दिला की नफा विक्रीतून नाही, तर खरेदीतून होतो आणि बाजारात नैसर्गिकरित्या चढ-उतार होत असतात.
