Union Budget 2026 Railways Projects Announcements : देशाचं रेल्वे जाळं विस्तारित आणि गतीमान करण्याकरता केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. याचा फायदा मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चैन्नई, दिल्ली,वाराणसी आणि सिलिगुडी या प्रमुख शहरांना होणार आहे.
निर्मला सीतारमण म्हणाल्या, “पर्यावरणदृष्ट्या शाश्वत प्रवासी व्यवस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, आम्ही शहरांमध्ये विकास जोडणारे सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करू. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलीगुडी या शहरांमध्ये स्पीड रेल्वे कॉरिडोर विकसित करणार आहोत.”
कोणत्या सात शहरांमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स असणार?
१. मुंबई ते पुणे
२. पुणे ते हैदराबाद
३. हैदराबाद ते बेंगळुरू
४. हैदराबाद ते चेन्नई
५. चेन्नई ते बेंगळुरू
६. दिल्ली ते वाराणसी
७. वाराणसी ते सिलीगुडी

