Silicon Valley AI escort trend : सध्या जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयची धूम आहे. यात अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्या आघाडीवर आहेत. एआय क्षेत्रातील अभूतपूर्व तेजीमुळे केवळ तंत्रज्ञान कंपन्याच मालामाल झाल्या नाही, तर या इथे काम करणारे इंजिनिअर्स, फाउंडर्स आणि गुंतवणूकदारांच्या रूपात एक नवा श्रीमंत वर्ग तयार झाला आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत पाण्यासारखा पैसा वाहत आहे. मात्र, हे पैसे खर्च करण्याचा ट्रेंड आता बदलत असल्याचे समोर आले आहे. ‘फोर्ब्स’च्या एका ताज्या अहवालानुसार, एआय आणि तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या एस्कॉर्ट्सना सिलिकॉन व्हॅलीत मागणी वाढली आहे. यासाठी ते तासाला ५ लाख रुपये ते दिवसाला १९ लाख रुपये इतकी मोठी रक्कम मोजत आहेत.
या नव्या ट्रेंडला उद्योग जगतात ‘नर्ड-फर्स्ट’ एस्कॉर्ट्स म्हटले जात आहे. म्हणजेच अशा महिला, ज्या केवळ देखण्या नसून एआय, जीपीयूस, क्रिप्टोकरन्सी, मानवाचे दीर्घायुष्य आणि तंत्रज्ञानाचे भविष्य यांसारख्या विषयांवर तासनतास गप्पा मारू शकतात.
‘नर्ड-फर्स्ट’ ट्रेंड नेमका काय आहे?
पारंपारिक एस्कॉर्ट्सच्या तुलनेत या क्षेत्रातील महिला आपली ओळख बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा संगम अशी करतात. यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर केवळ ग्लॅमरस फोटोंऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिसिस आणि नवीन तंत्रज्ञानावरील पोस्ट पाहायला मिळतात. पूर्वी फायनान्स क्षेत्रात काम करणारी आणि आता या एस्कॉर्ट सेवा देणाऱ्या एका तरुणीने सांगितले, की एआयमुळे जॉब जाईल या भीतीने ती या क्षेत्रात आली. तर डेटा ॲनालिसिसमध्ये काम करणाऱ्या ‘ऐला’ नावाच्या एस्कॉर्टने याला ‘नर्ड फर्स्ट’ दृष्टिकोन म्हटले आहे.
सामान्य दरांपेक्षा अनेक पटीने जास्त मानधन
महागड्या एस्कॉर्ट सामान्यतः प्रति तास १,००० डॉलर घेत असताना, नर्ड-फर्स्ट महिलांचे मानधन थक्क करणारे आहे. त्यांच्या मते, बाजारात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या महिला केवळ सुंदर नसून, त्या अत्यंत बुद्धिमान आहेत. या महिला साधारणपणे ३,५०० ते ५००० डॉलर प्रतिसास म्हणजे भारतीय रुपयांत ५ लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. संपूर्ण दिवसासाठी तब्बत १९ लाख रुपये देणारे लोकंही बाजारात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तरुणीही आता एआय आणि तंत्रज्ञानाची माहिती घेऊन स्वतःला अद्ययावत करत आहेत.
शारीरिक संबंधांपेक्षा ‘चर्चा’ महत्त्वाची!
या अहवालातील सर्वात रंजक बाब म्हणजे, या महागड्या भेटींमध्ये शारीरिक संबंधांपेक्षा दीर्घ तांत्रिक आणि तात्त्विक चर्चांवर जास्त भर दिला जातो. एस्कॉर्ट एडा हॉपरच्या मते, सोशल मीडियावर एआयबद्दल पोस्ट केल्यास एनव्हिडियामध्ये काम करणारे श्रीमंत तरुण लगेच आकर्षित होतात. एखाद्या एस्कॉर्टला ‘जीपीयू’ काय आहे हे माहित असणे, हेच त्यांच्यासाठी मोठे आश्चर्य असते. पुढी ती म्हणाली, बऱ्याचदा रात्रीच्या भेटींमध्ये काही वेळ शारीरिक संबंध सोडल्यास, उर्वरित बहुतांश वेळ हा तंत्रज्ञान, बिझनेस आणि भविष्य अशा विषयांवरील संवादातच जातो.
