Gold-Silver Price Today:   जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाच, भारतीय बाजारपेठेत मात्र सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव लक्षणीयरीत्या खाली आल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एका आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमती लक्षणीय कमी झाल्या आहेत. ६ मार्च २०२६ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६१,६७५ रुपयांच्या आसपास होता. संपूर्ण आठवड्याचा विचार करता सोन्याच्या किमतीत तब्बल ३,२७५ रुपयांची घट झाली आहे.

देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 15 March 2026)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १५ मार्च २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५९,६६० आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४६,३५० रुपये आहे. तर दुसरीकडे ६ मार्च रोजी चांदीचा भाव २,६८,५७९ रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे ९,३३० रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.चांदीचा आजचा दरदेशातील प्रमुख शहरांमध्ये चांदीच्या दरात आज खालीलप्रमाणे बदल दिसून येत आहेत:दिल्ली, मुंबई आणि कोलकाता: येथे १० ग्रॅम चांदीचा दर २,७५० रुपये आहे, तर १०० ग्रॅम चांदीसाठी २७,५०० रुपये मोजावे लागतील.चेन्नई: चेन्नईमध्ये चांदीचे दर थोडे जास्त असून १० ग्रॅम चांदी २,८०० रुपयांना मिळत आहे.(gold silver price)

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव

१. मुंबई (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,६६०

२२ कॅरेट: ₹१,४६,३५०

१८ कॅरेट: ₹१,१९,७४०

२. दिल्ली (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,८१०

२२ कॅरेट: ₹१,४६,५००

१८ कॅरेट: ₹१,१९,८९०

३. चेन्नई (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,६१,०२०

२२ कॅरेट: ₹१,४७,६००

१८ कॅरेट: ₹१,२४,०००

४. कोलकाता (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,६६०

२२ कॅरेट: ₹१,४६,३५०

१८ कॅरेट: ₹१,१९,७४०

५. अहमदाबाद (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,७१०

२२ कॅरेट: ₹१,४६,४००

१८ कॅरेट: ₹१,१९,७९०

६. लखनऊ (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,८१०

२२ कॅरेट: ₹१,४६,५००

१८ कॅरेट: ₹१,१९,८९०

७. पटना (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,७१०

२२ कॅरेट: ₹१,४६,४००

१८ कॅरेट: ₹१,१९,७९०

८. हैदराबाद (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,६६०

२२ कॅरेट: ₹१,४६,३५०

१८ कॅरेट: ₹१,१९,७४०

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.