Finance Minister Nirmala Sitharaman Union Budget 2026 Key Announcements : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून यातून अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प होता. त्यामुळे अनेकांचे या अर्थसंकल्पाकडे डोळे लागले होते. सामान्य वर्गासाठी या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. या अर्थसंकल्पातील पाच महत्त्वाच्या घोषणा आपण जाणून घेऊयात.

Live Updates
11:03 (IST) 2 Feb 2026

Bhusawal-Mumbai, Pune Train: भुसावळ–मुंबई, पुणे रेल्वे गाड्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रीन सिग्नल ?

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे जाळ्याच्या विस्ताराची घोषणा झाल्यानंतर भुसावळ–मुंबई व भुसावळ–पुणे स्वतंत्र रेल्वेगाड्यांना मंजुरी मिळणार का, याकडे प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. ...वाचा सविस्तर
10:32 (IST) 2 Feb 2026

महायुती सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमुक्ती योजनेला अजित पवार यांचे नाव ?

महायुती सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमुक्ती योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आहे. कर्जमाफी ३० जून २०२६ पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
09:48 (IST) 2 Feb 2026

Game-changer Budget : धुळे खान्देशवासीयांच्या आशा आणखी पल्लवीत; अर्थसंकल्प गेम चेंजर?

२०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प खान्देशासाठी ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता आहे. पूर्व–पश्चिम मालवाहू कॉरिडॉर, डीएमआयसी आणि दळणवळण प्रकल्पांमुळे उद्योग, गुंतवणूक व रोजगाराला नवी गती मिळणार आहे. ...सविस्तर वाचा
20:41 (IST) 1 Feb 2026

Union Budget 2026 Education Policy : अर्थसंकल्पात परदेशी ज्ञानार्जनास पायघड्या

केंद्रीय अर्थसंकल्पात परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या शुल्कावरील 'टीसीएस' कमी केल्याने जागतिक स्तरावर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. ...सविस्तर बातमी
19:02 (IST) 1 Feb 2026

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य! प्रथमच १ लाख कोटींच्या पुढे तरतूद…

केंद्रीय अर्थसंकल्पात पहिल्यांदाच आरोग्य क्षेत्रासाठी १ लाख कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असून यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधा आणि संशोधनाला मोठी गती मिळेल. ...अधिक वाचा
13:18 (IST) 1 Feb 2026

Union Budget 2026 Top 5 Announcements : ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा विकास करण्यावर भर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आम्ही ५,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये, म्हणजेच टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करत राहू. २०२६-२७ मध्ये सार्वजनिक भांडवली खर्च १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे, असेही त्यांनी सांगितले.

13:14 (IST) 1 Feb 2026
Union Budget 2026 Top 5 Announcements : १ एप्रिल पासून नवा प्राप्तीकर कायदा लागू केला जाणार

१ एप्रिल पासून नवा प्राप्तीकर कायदा लागू केला जाणार आहे अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. तसंच प्राप्तीकर भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली जाईल असंही सीतारमण यांनी म्हटलंं आहे.

  • आयटीआर अपडेटसाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत
  • १ एप्रिल २०२६ पासून देशात इन्कम टॅक्स अॅक्ट २०२५ अर्थात नवा प्राप्तीकर कायदा लागू होणार
  • “मी लहान करदात्यांसाठी एक योजना प्रस्तावित करत आहे, ज्यामध्ये नियम-आधारित स्वयंचलित प्रक्रियेमुळे मूल्यांकन अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याऐवजी कमी किंवा शून्य कर कपातीचे प्रमाणपत्र मिळवणे शक्य होईल. अनेक कंपन्यांमध्ये सिक्युरिटीज असलेल्या करदात्यांच्या सोयीसाठी, मी डिपॉझिटरीजना गुंतवणूकदाराकडून फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५एच स्वीकारून तो थेट विविध संबंधित कंपन्यांना प्रदान करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव देत आहे,” असे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.
  • 13:13 (IST) 1 Feb 2026

    Union Budget 2026 Top 5 Announcements : आयटीआर भरण्याच्या भरण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल

    २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकर भरण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल जाहीर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “मी रिटर्न सुधारण्यासाठी उपलब्ध असलेली वेळ ३१ डिसेंबर ते ३१ मार्च पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडते, ज्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. मी कर रिटर्न भरण्याची वेळही बदलण्याचा प्रस्ताव मांडते. आयटीआर १ आणि आयटीआर २ असलेल्या व्यक्ती ३१ जुलैपर्यंत त्यांचे आयटीआर भरतील, तर ऑडिट नसलेल्या व्यवसायांना किंवा ट्रस्टना ३१ ऑगस्टपर्यंत वेळ दिला जाईल.”

    13:12 (IST) 1 Feb 2026

    Union Budget 2026 Top 5 Announcements : पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ७ अतीजलद रेल कॉरिडॉर्स

    पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ७ अतीजलद रेल कॉरिडॉर्स

  • मुंबई ते पुणे</li>
  • पुणे ते हैदराबाद
  • हैदराबाद ते बंगळुरू
  • हैदराबाद ते चेन्नई
  • चैन्नई ते बंगळुरू
  • दिल्ली ते वाराणसी
  • वाराणसी ते सिलिगुडी
  • 13:10 (IST) 1 Feb 2026

    Union Budget 2026 Top 5 Announcements : अर्थमंत्र्यांकडून सहा क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव

    २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “आर्थिक वाढीला गती देण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी, मी सहा क्षेत्रांमध्ये हस्तक्षेपाचा प्रस्ताव मांडत आहे – ७ धोरणात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढवणे; पारंपरिक औद्योगिक क्षेत्रांना पुनरुज्जीवित करणे; यशस्वी एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) तयार करणे; पायाभूत सुविधांना चालना देणे; दीर्घकालीन सुरक्षा आणि स्थिरता सुनिश्चित करणे; शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास करणे.”

    13:08 (IST) 1 Feb 2026
    Union Budget 2026 Top 5 Announcements : निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले तीन कर्तव्ये

    यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी तीन कर्तव्य जाहीर केले.

  • त्यानुसार, पहिलं कर्तव्य हे आर्थिक विकासाचा वेग वाढवणं आणि तो वेग कायम ठेवणं. यासाठी उत्पादकता व स्पर्धात्मकता वाढवणं. जागतिक स्तराच्या सुविधा निर्माण करणं आहे.
  • दुसरं कर्तव्य हे आपल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणं, त्यांचं कौशल्य वाढवणं, त्यांच्या क्षमता वाढवणं व भारताच्या समृद्धतेच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेणं.
  • तर, तिसरं कर्तव्य हे सबका साथ, सबका विकास या तत्वावर आधारित विकास साध्य करणं. यातून प्रत्येक कुटुंब, समाज, प्रदेश यांना साधन-संपत्ती, सुविधा व संधी समान पद्धतीने उपलब्ध असतील.