Chirayu Rana Lawsuit Against JP Morgan Lorna Hajdini: जे.पी. मॉर्गनच्या कार्यकारी संचालक लोर्ना हजदिनी या एका वादात सापडल्या आहेत. जे.पी. मॉर्गनचे माजी कर्मचारी चिरायू राणा यांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. सध्या गुंतवणूक संस्था ‘ब्रेगल सेजमाउंट’मध्ये ‘प्रिन्सिपल’ म्हणून कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय राणा यांनी, या आठवड्याच्या सुरुवातीलाच हजदिनी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे, अशी माहिती अनेक सूत्रांनी ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला दिली.
लोर्ना हजदिनी यांच्यावरील आरोप
जॉन डो या टोपणनावाने चिरायू राणा यांनी दाखल केलेल्या दाव्यात, त्यांनी जे.पी. मॉर्गनच्या लेव्हरेज्ड फायनान्स टीममधील ३७ वर्षीय कार्यकारी संचालिका लोर्ना हजदिनी यांच्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. दाव्यानुसार, राणा यांनी असा आरोप केला आहे की, हाजदिनीने त्यांना रोहिप्नॉल आणि व्हायग्रा देऊन गुंगी आणली आणि एक प्रकारे “लैंगिक गुलाम” बनवले.
बुधवारी संध्याकाळी (३० एप्रिल २०२६) ‘द डेली मेल’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर लैंगिक छळाचे हे आरोप उघडकीस आले. या वृत्तात एका न्यायालयीन दस्तऐवजातील धक्कादायक तपशीलांचा संदर्भ देण्यात आला होता. हा दस्तऐवज आता मागे घेण्यात आला असून, तो “दुरुस्तीसाठी” काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
एका ब्रिटिश टॅब्लॉइडने, आता वगळण्यात आलेल्या न्यायालयीन कागदपत्रांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, हाजदिनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय राणा यांच्या अपार्टमेंटमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांनी राणा यांच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली, असा आरोप करण्यात आला आहे. २०२४ मध्ये आपण जेपी मॉर्गनच्या ‘लेव्हरेज्ड-फायनान्स’ टीममध्ये रुजू झाल्यानंतर काही कालावधीतच हा प्रकार सुरू झाला, असा दावा त्यांनी केला आहे.
जे.पी मॉर्गनने आरोप फेटाळले
सूत्रांचा हवाला देत ‘न्यू यॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, बँकेतील ३७ वर्षीय एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे बनावट आरोप केल्याचा ठपका राणा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपांच्या संदर्भात करण्यात आलेल्या अंतर्गत चौकशीत, कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही.
जॉन डो (चिरायू राणा) यांच्या ओळखीबाबत भाष्य करण्यास नकार देणाऱ्या बँकेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, बँकेच्या मानव संसाधन विभागाने (HR) आणि अंतर्गत कायदेशीर सल्लागारांनी केलेल्या सखोल चौकशीत, राणा यांनी केलेल्या आरोपांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा आढळला नाही. या चौकशीमध्ये संबंधित टीमचे फोन रेकॉर्ड्स आणि ईमेल्सच्या तपासणीचा समावेश होता.
चिरायू राणा कोण आहेत?
ब्रेगल सेजमाउंटच्या वेबसाइटनुसार, चिरायू राणा हे ब्रेगल सेजमाउंटमध्ये प्रिन्सिपल आहेत, जिथे ते सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा, वित्तीय तंत्रज्ञान, व्यवसाय सेवा आणि ग्राहक सेवा या क्षेत्रांमधील गुंतवणुकीची सुरुवात करणे आणि त्यांच्या जोखीम मूल्यांकनाची जबाबदारी सांभाळतात.
ब्रेगल सेजमाउंटमध्ये रुजू होण्यापूर्वी, चिरायू जेपीमॉर्गनमध्ये उपाध्यक्ष होते, जिथे त्यांनी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमधील ‘स्पॉन्सर-बॅक्ड क्रेडिट’ संधींची निर्मिती, रचना आणि जोखीम मूल्यांकन यावर काम करायचे.
तत्पूर्वी, ते मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये गुंतवणूक व्यावसायिक होते, जिथे ते खाजगी पत गुंतवणुकीचे अंडररायटिंग, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार होते. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, चिरायू यांनी द कार्लाइल ग्रुपमधील स्ट्रॅटेजिक क्रेडिट सोल्युशन्स ग्रुपमध्ये असोसिएट म्हणून आणि न्यूयॉर्कस्थित क्रेडिट सुईसमधील एम अँड ए ग्रुपमध्ये विश्लेषक/असोसिएट म्हणून काम केले. चिरायू यांनी रटगर्स युनिव्हर्सिटीच्या रटगर्स बिझनेस स्कूलमधून फायनान्समध्ये बी.एस. पदवी मिळवली आहे.
