DA Hike 2026 : गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणाऱ्या वाढीबाबत फक्त चर्चाच सुरू आहे. दरवर्षी साधारणपणे मार्च अखेरपर्यंत केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते. मात्र, यंदा एप्रिलचा अर्धा महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या १० वर्षांतील आकडेवारी पाहता, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महागाई भत्त्यात वाढ मिळत आली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे कर्मचारी संघटनांमध्ये असंतोष पसरला असून त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

किती वाढ अपेक्षित?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५८% दराने महागाई भत्ता मिळत आहे. महागाईच्या ताज्या आकडेवारीनुसार, यामध्ये सुमारे २% वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण डीए ६०% वर पोहोचेल. याचाच फायदा निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार आहे.

गेल्या १० वर्षांतील DA वाढीचा प्रवास

| घोषणा तारीख | नवीन डीए दर (%) | वाढ (%) |
| ६ ऑक्टोबर २०२५ | ५८% | ३% |
| २ एप्रिल २०२५ | ५५% | २% |
| २१ ऑक्टोबर २०२४ | ५३% | ३% |
| १२ मार्च २०२४ | ५०% | ४% |
| २० ऑक्टोबर २०२३ | ४६% | ४% |
| ३ एप्रिल २०२३ | ४२% | ४% |
| ३१ मार्च २०२२ | ३४% | ३% |

घोषणा तारीख नवीन डीए दर (%)वाढ (%)
६ ऑक्टोबर २०२५५८%३%
२ एप्रिल २०२५५५%२%
२१ ऑक्टोबर २०२४५३%३%
१२ मार्च २०२४५०%४%
२० ऑक्टोबर २०२३४६%४%
३ एप्रिल २०२३४२%४%
३१ मार्च २०२२३४%३%

(टिप: २०२० मध्ये कोरोनाकाळात महागाई भत्ता गोठवण्यात आला होता.)

विलंबाचे नेमके कारण काय?

आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, या विलंबामागे कोणताही धोरणात्मक बदल नाही. प्रशासकीय प्रक्रिया आणि मंजुरीच्या विविध टप्प्यांमुळे याला उशीर होत आहे. महागाई भत्ता हा एका ठराविक फॉर्म्युलावर आधारित असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, फाईल विविध विभागांकडून मंजूर होऊन येण्यास वेळ लागत असल्याचे समजते.

कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही!

घोषणा लांबणीवर पडली असली तरी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. महागाई भत्त्यातील ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल. त्यामुळे जेव्हा कधी घोषणा होईल, तेव्हा कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनची सर्व थकबाकी एकरकमी दिली जाईल.